आश्चर्य : इराकच्या माजी हुकुमशहा सद्दाम हुसेनचा मृतदेह कबरीतून रहस्यमयरित्या झाला गायब

0
नवी दिल्ली : इराकचा माजी हुकुमशहा सद्दाम हुसेन यांचा मृतदेह 12 वर्षांनी कबरीतून रहस्यमय रित्या गायब झाला आहे. त्याच्या गायब झालेल्या मृतदेहाबाबत अनेक तर्कविर्तक लावले जात आहेत. परंतू एकाही तर्कविर्तकास ठोस पुरावा नाही.
असे आहेत तर्कवितर्क

इराकचा एकेकाळचा हुकूमशहा सद्दाम हुसेन याला अमेरीकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी 30 डिसेंबर 2006 रोजी मध्यरात्राी फाशी दिली. त्याचा मृतदेह अमेरीकेच्याच सैनिकी विमानाने बगदादला नेला. तेथे अल अवाजमध्ये त्याचे दफन करण्यात आले.

गेल्या 12 वर्षानंतर त्याच काँक्रिटच थडगं तुटलेल्या अवस्थेत सापडले असून त्यात मृतदेहाचे अवशेषही शिल्लक नाहीत. दरम्यान कोणीतरी सद्दामच थडग खोदून त्याचा मृतदेह काढून घेत त्याला अग्निडाग दिल्याचे सद्दामचा वंशज शेख मनफ अली अल निदान हे सांगतात. तर आयसीएसच्या हवाई हल्लयात या थडग्याच नुकसान झाल्याचे थडग्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या शिया पॅरामिलिीटरी फोर्सच्या सैनिकांनी सांगीतले.

तर सद्दामची मुलगी हाला ही तिच्या खासगी विमानाने येथे आली व गुपचुपपणे वडीलांचा मृतदेह घेवून जॉर्डनला गेल्याचे सद्दामसाठी काम केलेल्या एका सैनिकाने सांगीतले आहे.

सद्दामची मुलगी 12 वर्षात एकदाही इराकला आली नसल्याचा दावा एका प्राध्यापकाने केला आहे.

LEAVE A REPLY

*