मध्यप्रदेश, छत्तीसगडसह राजस्थानमध्ये सुधारीत अ‍ॅट्रासिटी कायद्याच्या अंमलबजावणीस सुरवात

0
नवी दिल्ली : अ‍ॅट्रासिटी कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने काही सुधारणा करून तो लागु करण्याचे आदेश दिलेले आहेत. पंरतू यास विरोध होत असल्याने केंद्र सरकारने त्यावर पुर्नविलोकन याचीका दाखल केली आहे. यावर अजून निर्णय येणे बाकी आहे. असे असतांनाच भाजपाचे शासन असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांनी या सुधारीत कायद्याच्या अंमलबजावणीस सुरवात केली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला तत्काळ अटक न करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने 20 मार्चला दिला.

छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाचे पालन करण्याच्या औपचारीक सूचना दिल्या आहेत.

हिमाचल प्रदेश सरकारने पत्रक जारी करत पोलिसांना कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याची अनौपचारिक सूचना केली आहे. तर हरयाणा सरकारने या मुद्द्यावर कायदेशीर सल्ला मागितला आहे.

LEAVE A REPLY

*