पेट्रोल शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर : सीरीयातील तणावाचा परिणाम

0
मुंबई : सीरीयातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 80 डॉलर प्रतिबॅरल होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पेट्रोल 90 ते 100 रूपयांपर्यत जाईल. कच्च्या तेलांच्या किंमतींनी गेल्या तीन वर्षात उच्चांक गाठला आहे. या किंमती वाढल्या तर रूपयांची घसरण होईल.

परिणामी कच्चे तेल खरेदी करण्यासाठी शासनाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील.याचा परिणाम सर्वसामान्य नागरीकांना बसेल.पश्चिम आशियातील संभाव्य अस्थिरतेचा विपरीत परिणाम कच्च्या तेलांच्या किमतीवरही झाला. कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या तीन वर्षांतील उच्चांक गाठला.

वायदा बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर ७२ डॉलरवर पोहोचले होते. सीरियावरील कारवाईमुळे पश्चिम आशियात तणाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने कच्च्या तेलाचे दर आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

*