15 मिनीट बोलू द्या, मोंदी संसदेत कधीच येणार नाहीत : राहुल गांधी

0
नवी दिल्ली : संसदेत 15 मिनीटे बोलू द्या. त्यानंतर श्री. मोदी कधीच संसदेत उभे राहणार नाहीत. असे मत अमेठी दौर्‍यावर असलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल यांनी व्यक्त केले आहे.

देशात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यावरून श्री. गांधी यांनी श्री. मोदी यांच्यावर शरसंधान साधले. नीरव मोदी 30 हजार कोटी रूपये घेवून पळून गेला. विजय मल्ल्याही कर्ज काढून पैसे घेवून पळून गेला. त्याबाबत श्री. मोदी संसदेत एक शब्दही बोलत नाहीत.नीरव मोदीं 30 हजार कोटी घेवून पळून गेले.

रोज राष्ट्रीय बँकातील कर्जातील घोटाळे उघडीस येत आहे. मोदींनी देशातील बँकांचे वाटोळे केले आहे. आपल्याच पैशासाठी आपल्यालाच रांगेत तासनतास उभे राहावे लागत आहे.

यातून फक्त 15 लोकांनाच अच्छे दिन आले आहे. तर सामान्य लोेक, मजुर, गरीब यांचे मात्र बुरे दिन सुरू झालेले आहेत.
याबाबत संसदेत बोलण्यासाठी 15 मिनीटे द्या. त्यानंतर मात्र संसदेत उभे राहू शकणार नाही.

LEAVE A REPLY

*