तहसिलदारांनी शेंदुर्णी नगरपंचायत प्रशासक म्हणुन पदभार स्वीकारला

0

दिग्विजय सूर्यवंशी | शेंदुर्णी ता-जामनेर :  येथिल नगरपंचायत प्रशासक म्हणुन तहसिलदार नामदेव टिळेकर यांनी सोमवार दि .१६ रोजी प्रशासक म्हणुन पदभार स्वीकारला.

नगरपंचायतीचा अध्यादेश ३१ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्याने ग्रामपंचायत बरखास्त होऊन पुढील कार्यवाही होईपर्यंत नामदेव टिळेकर तहसिलदार जामनेर यांची प्रशासक म्हणुन १ एप्रिलपासुन अतिरीक्त कार्यभार दिला होता. परंतु, महसुल वर्ष समाप्ती आणि जामनेर नगरपरीषद निवडणुकीची जबाबदारी असल्याने काल प्रशासक म्हणुन जबाबदारी स्विकारण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे दि. १६ रोजी नगरपंचायतीमध्ये येत ग्रामविस्तार अधिकारी भास्कार पारधी यांच्याकडून प्रशासक म्हणुन पदभार स्वीकारला. नगरपंचायतीची निवडणुक होईपर्यंत प्रशासक म्हणुन नेमणुक रहाणार आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी वॉर्ड रचना, मतदार यादी यांची पुनरचना होण्यासाठी सहा ते आठ महिने लागु शकतात. तसेच, लोकसंखेनुसार वॉर्डरचना होऊन १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशी १८ लोकांची बॉडी असणार आहे. प्रशासक पदी असेपर्यंत गावातील समस्या दुर करण्याचा प्रयत्न करणार असुन नविन शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असेल. असे तहसिलदार टिळेकर यांनी सांगितले.

पहिल्याच दिवशी गावाचा आढावा

पदभार स्वीकारून ग्रामपंचायतीच्या काळातील कामाचा लेखाजोखा घेतला. तसेच, कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत काही सुचना देखील दिल्या. पाणी पुरवठा योजनेची माहीती घेत पाणीपुरवठा करणाऱ्या गलवाडा आणि गोंदेगाव धरणाची पहाणी केली. पाण्याबाबत आढावा घेऊन पाणीटंचाईच्या उपाययोजनांची अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीचा दर्जा प्राप्त झाल्याने सर्वात जास्त आनंद कर्मचाऱ्यांना झाला असल्याचे त्यांच्या बोलण्यातुन दिसुन आले. तसेच, आलेल्या नविन प्रशासकाचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन कर्मचाऱ्यांनी केले.
पंचायत समितीचे बीडीओ अरुण जोशी यांनी भेट देत तहसिलदार नामदेव टिळेकर यांच्या सोबत चर्चा केली.

LEAVE A REPLY

*