# Breaking News # अडावद व धानोरा येथे झन्ना मन्ना जुगारावर धाड : 45 जणांना घेतले ताब्यात

0
भुसावळ / अडावद, ता. चोपडा । प्रतिनिधी : येथील पोलिस उपअधिक्षक निलोत्पल यांनी काल मध्यरात्री व आज पहाटे चोपडा तालुक्यात दोन ठिकाणी धाडी टाकून जुगाराचे अड्डे उध्वस्त केलेत. यात पहिल्या धाडीत सुमारे 23 जणांना तर दुसर्‍या धाडीत 22 आरोपींना पकडण्यात आले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यातील एवढी मोठी ही पहिलीच कारवाई आहे. यामुळे जुगार, सट्टा खेळणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की अडावद पीएस अधिकार क्षेत्रात भुसावळचे पोलिस उपअधिक्षक निलोत्पल यांनी अडावद येथील जुगार अड्डयावर आज मध्यरात्री पासून सकाळी आठ वाजेपर्यत धाड टाकली. यात 23 आरोंपींना जुगार खेळतांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून रोख रूपये 4,18,360, रूपये 2 ,60,000 किंमतीचे मोटारसायकल, 12 लाख रुपये किमतीच्या तीन चार चाकी व 4. 55,500 रु. किंमतीचे मोबाईल असे एकूण एकूण मूल्य – रू. 17,35,860 चा मुद्देमाल आदी जप्त करण्यात आला आहे.

तर दुसरी धाड धानोरा पोलिस चौकीजवळील हायवेवरील धानोरा गावात जुगारावर धाड घातली. तेथे 22 आरोपी झन्ना मन्ना खेळतांना रंगेहाथ पकडण्यात आले. येथे रु. 1,33,000 रु रोख, 14 मोटारसायकल किंमत 3,40,000
रु. 23,00,000 ची किंमत असलेली 6 चार चाकी वाहने व 55 मोबाइल किंमत 46,500 रूपये असा एकूण मूल्य 28,19,500 चा मुद्देमराल जप्त केले आहे.

दोन्ही धाडींतून रु 45,55,360 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईसाठी  पीएसआय विशाल पाटील, समाधी पाटील, झुबेर शेख, भूषण पाटील (बीएसएल सिटी सर्व 4)  एएसआय दिलीप कोली, संकेत जामरे, विशाल सपकाळे, राजेश काळे, अयाज (सर्व एसडीपीओ ऑफिस कर्मचारी),हेमंत पाटील, चेतन ढकेने, नितेश बकवास, राकेश बिर्हडे (सर्व आरसीपी प्लॅटून) यांनी सहकार्य केले. त्यांना उपअधिक्षक निलोत्पल यांचे मार्गदर्शन मिळाले.

आखाजीच्या आधीच पोलिस कारवाईची आखाजी

आखाजी ला दोन दिवस बाकी असल्याने अनेक ठिकाणी जुगारासह झन्ना मन्ना जोरात सुरू आहे. त्यानुसार पोलिसांनी अडावद व धानोरा येथे धाड टाकून केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. यात पहिल्या धाडीत 23 व दुसर्‍या धाडीत 22 असे 45 आरोपींना पकडले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

*