अमळनेरच्या आईस्क्रिम पार्लरवर पोलिसांची धाड : प्रेमी युगलांना घेतले ताब्यात

0
अमळनेर : प्रतिनिधी | शहरातील स्टेशन रोड वरिल हशमजी प्रेमजी शॉपींग सेंटर मधील व त्या परिसरातील काही आईस्क्रीम पार्लर दूकानांवर पो नि अनिल बडगूजर व सहकारी पोलीसांनी आज अचानक धाड टाकून काही तरूण व तरूणींना अभद्र चाळे करित असतांना रंगेहात पकडले.

यात ८ ते १० मूलींना त्याच ठिकाणी ताकीद देवून सोडून देण्यात आले तर टारगट मूलांना पोलीस स्टेशनला बसवून ठेवले आहे. घटनेची माहिती मिळताच पालक व  पाहणाऱ्या नागरिकांनी गर्दि केली.

या ठिकाणी पालकांनी देखील गर्दी केली यात दोन दूकानांची तोडफोड करण्यात आली. प्रेमी यूगलांना शांततेत बसण्यासाठी या दूकानात विशेष व्यवस्था करण्यात येत असे. तासावर पैसे घेतले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंबटशौकींनासाठी ही जागा ठरलेली होती.

याच भागात मोठ्या प्रमाणात मूली मुलांच्या शिकवण्यांचे क्लासेस भरतात त्यामूळे या परिसरात दहावी पासून ते महाविद्यालयात शिकणारे मूले मूलींचा राबता असतो पोलीसांच्या या कार्यवाहीचे अनेकांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

*