पंजाबच्या गेलचे वादळ…चैन्नईचा चार धावांनी पराभव

0
चंदीगड । अटीतटीच्या सामन्यात पंजाबने चैन्नईला चार धावांनी पराभूत करीत आपला दबदबा दाखवून दिला. चैन्नईने विजयासाठी चांगलीच लढत दिली मात्र ती अपुरी ठरली. त्या मुळे महेंदद्रसिंग धोनीचे अर्धशतकही व्यर्थ ठरले. पंजाबने दिलेल्या 198 च्या धावांचे आव्हान पेलण्यास चैन्नई असमर्थ ठरले.

त्यांनी 20 षटकात 193 धावा केल्या. या सामन्यात क्रीस गेलने आपल्या पदर्पणातहील पहिल्याच सामन्यात चांगलाच जलवा दाखवुन दिला. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणा-या ख्रिस गेलने आज महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली.

केवळ 22 चेडूंमध्ये गेलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 33 चेंडूंमध्ये गेलने 63 धावांची धडाकेबाज खेळी केली. अखेर शेन वॉट्सनने गेलला इम्रान ताहीरकरवी झेलबाद केले. गेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवले .

दोन्ही संघांचा हा तिसरा सामना होतो. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर अत्यंत रोमहर्षक सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईने दुसर्‍या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर मात केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबला मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पराभूत केले. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सात गड्यांनी पराभूत केले होते.

LEAVE A REPLY

*