आयपीएलदरम्यान महिलेचा विनयभंग : आरोपीला बेड्या

0
मुंबई । कठुआ, उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण भारताला हादरवून सोडले आहे. पण, अजूनही देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शुक्रवारी मुंबईत आयपीएल सामन्यादरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्सचा आयपीएलचा सामना सुरू होता. यादरम्यान, प्रेक्षकांमध्ये बसलेल्या महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गजेंद्र दादूलाल सतनामी (26) या युवकाला अटक केली आहे.

भर स्टेडीयमध्ये पीडित महिलेसोबत झालेल्या वादानंतर या आरोपीने महिलेशी ईल वर्तन केले आणि स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारचे भाष्य केले. त्यामुळे पीडित महिलेने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आरोपीस थेट वानखडे स्टेडीयममधून अटक केली आहे.

त्यानंतर आरोपीला कोर्टात सादर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्सचा आयपीएलचा सामना सुरू होता. त्या दरम्यान ही घटना घडली.

LEAVE A REPLY

*