Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

वर्सी महोत्सवात हजारो भाविकांनी घेतले दर्शन; पल्लव साहबने आज सांगता

Share
जळगाव ।  प्रतिनिधी :  अमर शहीद संत कंवरराम, संत बाबा हरदासराम, संत बाबा गेलाराम यांचा वर्सी महोत्सव गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. आज भक्तीमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत झेंडापूजनासह अखंड पाठसाहब व भोगसाहब पार पडला. 

वर्सी महोत्सवात दुपारी संत बाबा गेलाराम साहेब यांचे शिष्य देवीदास भाई, उल्हासनगर येथील साई बलराम साहेब, उज्जैन येथील साई हरिराम व ट्रस्टच्या वतीने रमेश मताणी, विजय दारा, अशोक मंधान, नंदलाल कुकरेजा, विशनदास मतानी, राजू प्रथ्यानी, राजू वालेचा, दयानंद विसरानी, जयरामदास कुकरेजा, धन:शामदास रावलानी यांच्या व बाबांच्या सेवाधारींच्या उपस्थितीत झेंडा पूजनचा कार्यक्रम झाला. व महिला मंडळांच्या तसेच गांधीधाम येथून आलेल्या विशनी ईसरानी यांनी बाबांचे भजन सादर केले. महाप्रसादाच्या कार्यक्रमात सुमारे 35 हजार भक्तगणांनी उपस्थिती देऊन लाभ घेतला.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली रंगत

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रात्री राधे नंदिनी- मथुरा, बाबा हरदासराम पटापटी टोली -जळगाव, कोमल मीरचंदानी (मखण म्युझिक पार्टी, मुंबई), बाबा हरदासराम म्युझिक पार्टी (रतन जाधवाणी) जळगाव, विशनी इसराणी-गांधीधाम गुजरात व बालकांद्वारे नृत्य कार्यक्रम सादर करण्यात आले.  दि.30 रोजी पल्लव साहेबच्या कार्यक्रमाने वर्सी महोत्सवाची सांगता होईल.

सायंकाळी अखंड पाठसाहेब, भोग साहेबचा कार्यक्रम देशभरातून आलेल्या संतगण व हजारो भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास अमरावती येथून साई राजेशलाल, लखनऊ येथील साई मोहनलाल, जबलपूर येथील साई रामदास, उज्जैन येथील साई हरीराम, उल्हासनगर येथील साई बलराम, इंदौरचे डॉ. नंदलाल व साई साधराम साहेब, नागपूर येथील साई पहलाजराम या संतांच्या उपस्थित सुख: शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

शहरातील सिंधी समाज बांधवांनी प्रतिष्ठाने ठेवली बंद

अखंड पाठसाहब व भोगसाहब कार्यक्रमाचा आज समारोप करण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी शहरातील सिंधी समाज बांधवांनी आपआपली प्रतिष्ठाने आज दिवसभर बंद असल्याने ऐरवी गजबजणार्‍या व्यापारी संकुलांमध्ये शुकशुकाट पसरला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!