उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणूकांसाठी अधिसूचना प्रसिध्द

0
जळगाव |  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांच्या निवडणूकांसाठी  मतदार याद्या तयार करण्याकरिता संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य/ परिसंस्थांचे संचालक तसेच शिक्षक आणि संस्थाचालक यांची माहिती मागविण्यासाठी विद्यापीठाने अधिसूचना प्रसिध्द केली आहे.
  निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांच्या स्वाक्षरीने या अधिसूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
संलग्नित महाविद्यालय किंवा परिसंस्था यांच्या व्यवस्थापन गटाने त्यांच्या मधून सहा प्रतिनिधी अधिसभेवर निवडून द्यावयाचे आहेत. त्यादृष्टीने व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींचा मिळून बनलेला निर्वाचक गण तयार करावयाचा आहे.
या निर्वाचक गणामध्ये व्यवस्थापन प्रतिनिधीचा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव किंवा एका प्रतिनिधीची माहिती विहित नमून्यात 24 जून पर्यंत पाठविणे आवश्यक आहे. या अधिसूचनेत व्यवस्थापनाचा प्रतिनिधी अधिसभेवर निवडून देण्यासंदर्भात विद्यापीठ कायदयातील तरतूदी व पात्रता दिल्या आहेत.
  त्याचप्रमाणे प्राचार्यांमधून अधिसभेवर दहा प्राचार्य निवडून दिले जाणार आहेत. तर अध्यापकांमधून अधिसभेवर दहा अध्यापक निवडून दिले जाणार आहेत.
तसेच विद्या परिषदेवर प्रत्येक विद्याशाखेचे दोन अध्यापक निवडून दिले जाणार आहेत.  त्यासाठी संलग्न महाविद्यालय व परिसंस्थांमधील प्राचार्य/ संचालकांची यादी तयार करुन निर्वाचक गण  तयार केला जाईल.
तसेच अध्यापकांसाठी  महाविद्यालय/परिसंस्थांमधील अध्यापकांची यादी तयार करुन त्यानंतर निर्वाचक गण तयार केला जाणार आहे.
 त्यासाठी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर www.nmu.ac.in/election या लिंकमध्ये विहित केलेल्या नमूना अर्जामध्ये नमूद करुन आवश्यक त्या दस्तऐवजासह त्या पिं्रटची प्रत 24 जून, 2017 पूर्वी विद्यापीठात सादर करावी, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
विद्यापीठ कायदयातील तरतूदी व पात्रता या अधिसूचनेत नमूद करण्यात आल्या आहेत. संलग्नित महाविद्यालयांना देखील यासंदर्भातील माहिती ई-मेलद्वारे कळविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*