Type to search

Breaking News आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

इंडोनेशियात कोसळलेल्या विमानाचा पायलट भारतीय

Share
नवी दिल्ली : इंडोनेशियाच्या समुद्रात आज सकाळी कोसळलेल्या लायन्स एअर जेट एअरवेजचा पायलट भारतीय असल्याची माहिती मिळाली आहे. भव्ये सुनेजा असे त्याचे नाव असून तो जिवत आहे की मृत हे अजून स्पष्ट झालेले नाही.
गेली दहा वर्ष ते पायलट म्हणून काम करत आहेत.२०११ मध्ये तो लायन्स एअरवेज या कंपनीत रुजू झाला. एक चालक म्हणून त्याच्या वरिष्ठांचं त्याच्याबद्द्लचं मत अत्यंत चांगलं आहे, ‘ आम्हाला कोणत्याही हालतीत त्याला सोडायचं नाहीये, तो जिवंत असावा अशी आम्ही सगळेच प्रार्थना करतो आहोत’ असं मत त्यांनी व्यक्त केलं.
भव्य मुळचा दिल्लीतील मयुर विहार परिसरातील रहिवाशी आहे. मला भारतात पोस्टिंग द्या अशी मागणी त्यान वरिष्ठांकडे केली होती. ती पूर्ण होत नसल्यामुळे तो लवकरच एका भारतीय एअरलाइन कंपनीत रुजू होणार होता.

जकार्ताहून ‘लायन एअर’च्या ‘बोईंग ७३७ मॅक्स ८’ या विमानाने पान्गकल पिनांगकडे जाण्यासाठी आज सकाळी उड्डाण केले. उड्डाणाच्या अवघ्या १३ मिनिटानंतर विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानाशी संपर्क तुटल्याची माहिती समोर आल्यानंतर विमानासाठी शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

जावा समुद्राच्या किनारी विमानाचे काही भाग आढळून आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. इंडोनेशियात समुद्रात विमान बुडालेल्या प्रवाश्यांचा शोध सुरू आहे. ते जिवंत आहेत की मृत याची मात्र अजूनही शहानिशा झालेली नाही. विमानातील प्रवाश्यांचे बरेच सामान सापडले असून शोध मोहीम सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!