‘तसल्या ’ तडजोडीच्या आल्या होत्या ऑफर : अलका कुबल

0
मुंबई : मोठा पडदा असो वा छोटा तेथे अभिनेत्री होऊ इच्छीणार्‍या युवती, महिलांना ‘तसल्या ’  तडजोड करण्याच्या ऑफर दिल्या जातात. जीने ही ऑफर स्विकारली तीला चित्रपटासह मालिकांमध्ये मागणी वाढते. असाच प्रकार माझ्याबाबतही घडला होता. परंतू मी तडजोड करण्यास नकार दिला. हे बोल आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचे.

हैदराबाद येथे भूमिका देण्याच्या मोबदल्यात ‘तडजोड’ कराव्या लागलेल्या श्री रेड्डी या अभिनेत्रीने दिग्दर्शकाने केलेल्या लैंगिंक शोषणाविरोधात सार्वजनिक ठिकाणी कपडे उतवरले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मराठी अभिनेत्री अलका कुबल व मृण्मयी देशपांडे यांनी आपला अनुभव शेअर केला आहे.
काय म्हणतात अलका कुबल
वयाच्या पंधराव्या वर्षापासून मी चित्रपटात काम करत आहे. तारूण्यात असतांना मला तसली तडजोड करण्याबाबत विचारले होते. जर तशी तडजो डकरणार असाल तर ही भूमिका मिळेल. पंरतू मी त्यास स्पष्ट नकार दिला. अशा पध्दतीने काम करण्यांचा काही काळापूरता वापर होतो. वापर झाला की बाजुला केले जाते. म्हणून अशा तडजोडीतून मिळलेले यश अल्पकालीन असते. विनातडजोड काम करायचे की तडजोडीतच संपायचे हे ज्याने त्याने ठरवायचे.

LEAVE A REPLY

*