ओवेरियन कॅन्सरवरील नवे औषध प्रभावी

0
लंडन | वृत्तसंस्था :  कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. यावर वेळीच आणि योग्य उपचार हाच एकमेव पर्याय असतो. असे जर झाले नाही तर प्रसंगी रुग्णाच्या जीवावरही बेतते.

या आजाराचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये ‘ओवेरियन कॅन्सर’चाही समावेश आहे. कॅन्सरच्या यावरील उपचारासाठी संशोधकांनी शोधलेले औषध प्रभावी ठरले आहे.

‘ओवेरियन कॅन्सर’वरील उपचारासाठी संशोधक दीर्घ काळापासून औषध शोधण्याच्या प्रयत्नात होते. अखेर त्यांना यश मिळाले. या औषधाच्या सुरुवातीच्या चाचणीत ‘ओवेरियन कॅन्सर’ची गाठ वेगाने आकूंचन पावत गेल्याचे आढळून आले.

लंडनमधील ‘इन्स्टिट्यूट ऑङ्ग कॅन्सर रिसर्च अँड रॉयल मार्सडन एनएसएस ङ्गाऊंडेशन ट्रस्ट’च्या संशोधकांनी ओवेरियन कॅन्सरवर ‘ओएनएक्स-०८०१’ या नव्याने विकसित औषधाची यशस्वी चाचणी घेतली.

संशोधकांनी ‘ओएनएक्स -०८०१’ या औषधाची प्रामुख्याने १५ महिलांवर चाचणी घेतली. यामध्ये असे आढळून आले की, या औषधाच्या वापराने ओवेरियन कॅन्सरची गाठ आकुंचित झाल्याचे दिसून आले.

हे औषध कॅन्सरच्या कोशिकांवर हल्ला करताना ङ्गॉलिक ऍसिडसारखे काम करते. यामुळे संशोधकांना असे वाटू लागले आहे, ज्या महिलांना हा कॅन्सर झाला आहे आणि अन्य औषधे कुचकामी ठरली आहेत, त्यांच्यावर नवे औषध अत्यंत उपयुक्त ठरेल.

LEAVE A REPLY

*