मुख्यमंत्र्यांनी मनपास दिलेल्या२५ कोटीच्या निधीतून कामांबाबतचा तिढा अद्याप कायम

0
जळगाव |  प्रतिनिधी : जळगाव शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी २५ कोटीचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून कामे महानगरपालिकेने करावीत की बांधकाम विभागाने करावी, यावरुन वाद सुरु झाला असल्याचे समोर आले आहे.

कामे करायची कुणी? याचा तिढा कायम असल्यामुळे विकासकामे रखडली आहेत.

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी २५ कोटीची घोषणा केली होती. त्यानुसार विकासासाठी २५ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.

प्राप्त निधीतून विकासकामे करण्यासाठी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार २५ कोटीतून १० कोटीचे एलईडी पथदिवे, ७ कोटी रुपयांची गटार, शहरातील नाल्यांच्या संरक्षण भिंतीसाठी ५ कोटी तर शहरात भुमिगत वीजवाहिनीसाठी ३ कोटी असे विभाजन करण्यात आले आहे.

मात्र ही कामे मनपाने करावीत, की सार्वजनिक बांधकाम विभागाने करावीत, याबाबतचा तिढा मात्र कायम आहे.
पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील हे पाणी परिषदेसाठी जळगावात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आ.राजूमामा भोळे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांची बैठक घेवून आढावा घेतला.

दरम्यान अमृत योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात भुमिगत गटारींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्यामुळे ज्या भागात भुमिगत गटारी होतील, त्याव्यतिरिक्त अन्य परिसरात नवीन गटारी कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री ना.पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

*