मेहरुण तलावावर आढळला १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  मेहरुण तलावावर आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्याठिकाणी दुचाकी देखील मिळून आल्याने मयत तरुणीची ओळख पटविण्यास पोलिसांना मदत झाली. मयुरी सुरेशचंद्र पवार वय १९ रा. ऑटो नगर असे मयताचे नाव आहे.

ऑटो नगर मधील मयुरी पवार ही तरुणी बांभोरी येथील त्रिमुर्ती अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षाला शिकत असून तिने काही दिवसांपूर्वी ऑर्डनन्स फॅक्टरीत निघालेल्या पदांसाठी परिक्षा दिली होती.

या परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी मयुरी पवार ही सायंकाळी आपल्या दुचाकी क्रमाक एम एच १९ ए एच ०४८५ ने घरबाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने कुटुंबियांनी याबाबत रात्री एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती. रात्रभर कुटुंबियांनी तिच्या मित्र व मैत्रिणीकडे तिचा शोध घेतला.

दरम्यान शोध घेत असतांना सकाळी तिचा मित्र शुभम याला तिची दुचाकी मेहरुण तलावा काठी मिळून आली. शुभम याने याबाबत कुटुंबियांना माहिती दिली.

त्यानंतर कुटुंबिय त्याठिकाणी गेले असता, गाडीच्या डिक्कीत तिचा मोबाईल व सॅण्डल मिळून आली. यावेळी मयुरीच्या वडीलांना काहीतरी मनात शंका आली. काहीवेळानंतर मेहरुण तलावावर तिचा मृतदेह तरंगतांना दिसून आला. यावेळी कुटुंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

तलावावरील पोहणार्‍याच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे सपोनि समाधान पाटील, भगीरथ नन्नवरे यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान मयुरीने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

LEAVE A REPLY

*