शेतकर्‍यांना कर्जमाङ्गी नको कर्जमुक्ती हवी : भगवा सप्ताह कार्यक्रमात रवींद्र मिर्लेकर

0
पारोळा, |  प्रतिनिधी :  सरकार शेतकर्‍यांना न्याय देत नसेल तर शिवसेना सत्तेत असली तरी रस्त्यावर उतरणार. कारण शिवेसेनेची बांधिलकी जनतेशी आहे म्हणून सेनेचा शेतकर्‍यांच्या संपाला संपूर्ण पाठींबा असून संपूर्ण कर्जमुक्ती हि तात्पुरती सोय असून खरे तर शेतकर्‍यांना कर्जमाङ्गीपेक्षा कर्जमुक्ती मिळाली पाहिजे.

कर्जमुक्तीवर आमचा भर असल्याचे मत जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा येथे आयोजित भगवा साप्ताह कार्यक्रमात व्यक्त केले.

या कार्यक्रमास माजी आ.चिमणराव पाटील, सेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, बाजार समिती सभापती अमोल पाटील, जी.प.सदस्य डॉ.हर्शल माने, सेना तालुका प्रमुख प्रा आर.बी.पाटील, शहर प्रमुख बापू मिस्त्री, शेतकी संघ अध्यक्ष चतुर पाटील, जिजाबराव पाटील, प्रा बी.एन.पाटील, भैय्यासाहेब पाटील, गणेश पाटील, दादाभाऊ पाटील यांच्या सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी काही शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेबाबत काही तक्रारी मांडल्या व आम्ही एकरकमी सोसायटीचे कर्ज भरले असताना आम्हाला जिल्हा बँकेच्या ए.टी.एम. कार्ड द्वारे पैसे मिळत नाही.

त्या बाबत माजी आ. व जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक चिमणराव पाटील यांनी स्पष्ट केले, की जिल्हा बँकेला निधीची अडचण असून याबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी ३०० कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यास यावर मार्ग निघू शकतो.

प्रमुख मनोगतात रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले, की राज्यात मी कर्जमुक्त होणार असे लाखो अर्ज शेतकर्‍यांकडून भरून घेतले जात आहेत.

अर्ज जुलै महिन्यात अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्यापुढे मांडण्यात येतील व यावेळी शिवसेनेकडून दोन मागण्या मांडल्या जातील

त्यात स्वमिनाथन आयोग लागू करण्यात येवून तो लागू करावा व सरसकट कर्जमुक्ती मिळावी. त्या बाबत पाठपुरवा सुरु असून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका.

शिवसेना सत्तेत राहून तुमच्या साठी विरोधाची भूमिका घेत आहे यात सर्व काही आले असे मत त्यांनी यावेळी मांडले. सूत्रसंचालन प्रा आर.बी.पाटील तर आभार भारत पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*