आव्हाणे दंगलीप्रकरणी नऊ संशयितांना अटक

0
जळगाव | प्रतिनिधी :  तालुक्यातील आव्हाणे गावी पूर्ववैमनस्य व शेतात बकर्‍या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून दोन गटात दि.४ रोजी वाद झाला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात ऍस्टॉसिटी व दंगलीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे.

दरम्यान दुसर्‍या दिवशी गावात तणावपूर्ण शांतता होती. दोन्ही गुन्हयातील आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी देण्यात आली

आव्हाणे येथे दोन गटात वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारी होवून दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. हाणामारी गावातील जवळपास १०-१२ जखमी झाले असून तालुका पोलिसांनी वेळीच गावात धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे.

दरम्यान मागील भांडणाच्या कारणावरून जातीवाचक शिविळगाळ केल्याप्रकरणी तालुका पोलिसात जोंगेंद्र अरुण सांळुके वय २७ यांच्या फिर्यादीवरून अमोल गोकुळ पाटील, देवेंद्र दत्तात्रय पाटील, गोकुळ तुळशीराम पाटील, प्रल्हाद तुळशीराम पाटील, दत्तु तुळशीराम पाटील, प्रतिक उर्फे बापू प्रल्हाद पाटील या सहा जणांविरुध्द भादवी कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७, ५०६ ऍट्रासिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या गुन्हात सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या संशयितांना आज न्या चित्रा हंकारे यांच्या न्यायालयात हजर केले असता, दि.८ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे ऍड. प्रदीप महाजन यांनी काम पाहिले.

शेतात बकर्‍या व गुरे चरायला नेल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तालुका पोलिसात दाखल असलेल्या दुसर्‍या गुन्हात दत्तात्रय तुळशीराम पाटील वय ५८ यांच्या फिर्यादीवरून जोंगेंद्र अरुण सांळुखे, उमेश जगन सपकाळे, शिलाबाई अरुण सपकाळे, अरुण गोंविदा सांळुखे, राजु चिंतामण सपकाळे, प्रकाश अशोक सुरवाडे, अनिल पानचंद्र भालेराव, संजय भिका सपकाळे, राजेंद्र कालिदास सोनवणे यांच्या विरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यातील ३ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या संशयितांना न्या सिदनाळे यांच्या न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सरकारपक्षातर्फे ऍड. निखिल कुळकर्णी यांनी तर संशयितांतर्फे ऍड. कुणाल पवार यांनी काम पाहिले. दरम्यान पोलिसांनी गावातील काही संशयितांवर कलम ११० प्रमाणे कारवाई केली आहे.

गावात दुसर्‍या दिवशीही पोलिस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता होती.

LEAVE A REPLY

*