Type to search

maharashtra आवर्जून वाचाच टेक्नोदूत फिचर्स मुख्य बातम्या सेल्फी

या नव्या फिचरमुळे फेसबुक होणार अधिक लोकप्रिय : सर्वाधिक वापरकर्त्यांची होणार नोंद

Share
मुंबई : सोशल मिडियांमधील वाढत्या स्पर्धेमुळे आणि लोकप्रियतेच्या शिखरावर जाण्यासाठी आता फेसबुकनेही नवे फिचर लॉच केले आहे. लिप सिंग लाईव्ह फिचर, स्टोरी म्युझिक व प्रोफाईलवर गाणे अ‍ॅड करणे हे तीन नवे फिचर्स लॉच करत आहे. यामुळे फेसबुकचा वापर सध्यापेक्षा जास्त प्रमाणात होणार आहे.
 फेसबुक स्टोरीमध्ये आता म्युझिकचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. या फिचरमधून युजर्सला लवकरच आपल्या प्रोफाइलमध्ये आवडीचं गाणंही अॅड करता येणार आहे. यासोबतच फेसबुकनं लीप सिंग लाइव्ह फिचरही अपडेट केलं आहे.

प्रोफाइलवर गाणं अॅड करा

फेसबुकचं हे नवं फिचर लवकरच उपलब्ध होईल. या फिचरचा वापर करून युजर्सला प्रोफाइलच्या म्युझिक सेक्शनमध्ये गाणं अॅड करता येणार आहे. याशिवाय एखादं गाणं तुम्हाला प्रोफाइलमध्ये सर्वात पहिलं दिसावं यासाठी ‘पिन मार्क’चाही पर्याय असणार आहे.

फेसबुक स्टोरीमध्येही म्युझिक 

फेसबुक स्टोरीच्या फिचरमध्ये आता युजर्सला फोटोसह गाणं देखील पोस्ट करता येणार आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर तुम्ही निवडलेलं गाणं देखील सुरू होईल, असा हे अनोखं फिचर असणार आहे. फेसबुक स्टोरी म्हणून एखादा फोटो निवडताना त्यासोबत म्युझिक सर्च ऑप्शनमध्ये आवडीचं गाणं सर्च करता येईल. इतकच नव्हे तर गाण्यातील फक्त एखादं कडवं किंवा एखादी ओळ हवी असल्यास तसं सिलेक्शनही करता येणार आहे.

लिप सिंक लाइव्ह फिचर

फेसबुकचं हे फिचर सध्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. या फिचरमध्ये आता आणखी गाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. बहुचर्चित म्यूजिकली अॅपच्याच धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या फिचरच्या माध्यमातून लिप्सिंग सेल्फी व्हिडिओ तयार करता येणार आहेत. हे व्हिडिओ फेसबुकवर थेट पोस्टही करता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!