जळगावच्या लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कै. व्ही. जी. तात्यांच्या पत्नीही इच्छूक

जिल्हा निवड समितीसमोर रावेरसाठी डॉ. उल्हास पाटील यांच्यासह 15 जणांनी दिल्या मुलाखती

0
जळगाव लोकसभेसाठी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही.जी.पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील देखील इच्छुक असल्याने त्यांच्यावतीने श्रीधर चौधरी यांनी मुलाखत दिली.

जळगाव ।  प्रतिनिधी :  जिल्हा काँग्रेस निवड समितीच्या वतीने सोमवारी जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दोन जागांसाठी 15 जणांनी मुलाखती दिल्यात. माजी जिल्हाध्यक्ष स्व.व्हि.जी. पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील यांनीही त्यांचे प्रतिनिधी श्रीधर चौधरी यांच्यामार्फत इच्छुक म्हणून मुलाखत दिली.

मुलाखती जिल्हा प्रभारी हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीने घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, महानगराध्यक्ष अर्जून भंगाळे, प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सचिटणीस ललिता पाटील, प्रदेश सचिव डी.जी. पाटील, योगेंद्रसिंह पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी आदींची उपस्थिती होती.

यांनी दिल्या मुलाखती

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी प्रा.शिवाजी दौलत पाटील (पाचोरा), रजनी विश्राम पाटील (जळगाव), अशोक हरी खलाणे (चाळीसगाव), सुलोचना वाघ (अमळनेर), धनंजय चव्हाण (चाळीसगाव), ललीता पाटील (अमळनेर) आणि परवेज पठाण (जळगाव) तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी डॉ. उल्हास पाटील (जळगाव), पप्पू छबीदास पाटील, नितीन रमेश चौधरी, निळकंठ फालक, मारूती नारायण सुरळकर (मुक्ताईनगर), शंकर शिवलाल राजपूत (जामनेर), डॉ. जगदीश पाटील (मुक्ताईनगर) आणि मुन्नवर खान यांनी मुलाखती दिल्यात.

डॉ.भंगाळेंसाठी आग्रह

काँग्रेस भवनात इच्छूकांच्या मुलाखत प्रक्रिया सुरु असताना यावेळी कॉग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातून महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, त्यांच्या पाठीशी आम्ही एकसंघ उभे राहून त्यांना निवडून आणू असा विश्वास व्यक्त करीत जिल्हा प्रभारी हेमलता पाटील यांना मागणी केली.

LEAVE A REPLY

*