Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

खा.ए.टी.नाना बनले ‘देवदूत’: रस्त्यावर हृदयविकाराने विव्हळणार्‍या तरूणीला वाहनातून आणले रूग्णालयात

Share
धरणगाव ।  प्रतिनिधी :  मोटारसायकलीवरून जाणार्‍या तरूणीला हृदयविकाराचा त्रास होवू लागला. रस्त्याच्याकडेला थांबून तिचे आईवडील मदतीसाठी विनंती करू लागले. मात्र, एकही वाहन थांबत नव्हते. खा.ए.टी.नाना पाटील हे धरणगावकडे येत असतांना त्यांनी हे चित्र पाहिले. तात्काळ गाडी थांबवून त्यांनी स्वत: त्या मुलीला वाहनात बसवून धरणगावी आणले. प्रथोमपचार केल्यानंतर तिला जळगावी गोदावरी रूग्णालयात पाठविले. खा.ए.टी.नाना ‘देवदूत’बनून आले आणि आमच्या मुलीचे प्राण वाचविले अशी भावना मुलीच्या आईवडिलांनी व्यक्त केली.

रात्री 9 वाजता बिलखेडा येथील ईश्वर काशिराम पाटील पत्नी आणि मुलगी छाया(वय-19) सोबत चिंचपूर्‍याहून बिलखेड्याकडे येत होते. पिंप्रीच्या अलिकडेच छायाला हृदयविकाराचा झटका आला. ईश्वर पाटील यांनी मोटारसायकल थांबविली. छायाच्या हृदयाचे ठोके वेगाने धडकत होते.

याचवेळी धरणगावचे सचिन बागूल त्यांच्या मदतीसाठी थांबले. मुलीची अवस्था बघून तिला रूग्णालयात नेण्यासाठी ईश्वर पाटील आणि सचिन बागूल रस्त्याने येणार्‍या वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, कुणीही मदतीला थांबले नाही. दरम्यान, धरणगाव येथील श्री बालाजी वाहनोत्सवाला भेट देण्यासाठी येत असल्याचा भ्रमणध्वनी खा.ए.टी.नाना यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय महाजन यांना केला व ते जळगावहून धरणगावकडे निघाले होते.

वाटेत त्यांना पाटील कुटुंबिय दिसले. त्यांनी तात्काळ वाहन थांबविले. त्यांच्यासोबत असलेल्या प्रशांत बडगुजर, पो.कॉ.दिपक पाटील, अविनाश पाटील यांच्या मदतीने खा.ए.टी.पाटील यांनी स्वस्त: मुलीला उचलून गाडीत टाकले व भरधाव वेगाने धरणगाव ग्रामिण रूग्णालय गाठले.

तोपर्यत धरणगावचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, शिरिष बयस, चंद्रशेखर पाटील, सुनील वाणी आणि कार्यकर्ते ग्रामिण रूग्णलयात पोहचले होते. येथे सुध्दा खा.पाटील यांनी तात्काळ मुलीला स्वस्त: उचलून रूग्णालयात दाखल केले. डॉ.चौधरी,डॉ.मिलींद डहाळे यांनी प्रथमोपचार केल्यानंतर मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ.चौधरी यांनी सांगितल्यानंतर खा.पाटील यांनी डॉ.उल्हास पाटील यांच्याशी संपर्क साधला.

डॉ.पाटील यांनी मुलीला गोदावरी रूग्णालयात पाठविण्यास सांगितले. एका सामान्य मुलीचे प्राण वाचविण्यासाठी खासदार करीत असलेले परिश्रम पाहून ग्रामिण रूग्णालयात जमलेला जमाव भारावून गेला होता. लोकप्रतिनिधी हा लोकसेवक असल्याची जाणिव खा.ए.टी.नाना पाटील यांना असल्यामुळेच ते मदतीला धावून आल्याचे उपस्थित बोलत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!