पाण्याची लूट करणार्‍यांविरुद्ध सत्याग्रह पुकारा

0
जळगाव / जळगाव जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी पाण्याचे महत्व समजुन पाण्याची लुट करणार्‍यांविरूध्द सत्याग्रह पुकारा असे आवाहन जागतिक जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी आज पाणी परीषदेत केले.
महसुलविभागातर्फे आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे पाणी परीषद व स्वच्छ भारत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.
या परीषदेचे उद्घाटन जागतिक जलतज्ञ राजेंद्रसिंह व जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष माधवराव चितळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर हिवरे बाजार या आदर्श गावाचे सरपंच पोपटराव पवार, जलदुत भारत पाटील, पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, माजी महसुलमंत्री आ. एकनाथराव खडसे, जि.प. अध्यक्षा ना. उज्ज्वला पाटील, अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ना. मोहम्मद हुसेन खान, खा. ए.टी.पाटील, खा. रक्षा खडसे, आ. स्मिता वाघ, आ. हरीभाऊ जावळे, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. संजय सावकारे, आ. राजुमामा भोळे, आ. किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प.चे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडेपाटील, प्रांत जलज शर्मा, मनिषा खत्री, आदी मान्यवर उपस्थित होते.

जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, देशातील 22 राज्यांमध्ये दुष्काळाची परीस्थीती आहे. मागील 70 वर्षात दुष्काळ वाढतच राहीला आहे.

मध्य प्रदेश सरकारने नदी पुनरूज्जीवनाचे काम हाती घेऊन दुष्काळाचे सावट दुर करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारनेही जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातुन चांगले पाऊल टाकले आहे.

परंतु मागील वर्षी जलयुक्तच्या कामांमध्ये घट झाली. नैसर्गिक पाण्यापेक्षा जमिनीच्या पोटातील पाण्याचा उपसा करण्यावर अधिक भर दिला जात आहे ही खेदजनक बाब आहे. राजस्थानातही अशीच परीस्थीती होती.

पण त्याठिकाणी जलसाक्षरतेच्या माध्यमातुन पाण्याचा संदेश पोहचला. त्यामुळे राजस्थानात आत्महत्या थांबल्या. महाराष्ट्रात आजही आत्महत्या होत आहे.

परंतु आता सरकारने जलसाक्षरतेसाठी अभियानाची सुरवात केली ही स्वागतार्ह बाब आहे. राज्याला दुष्काळमुक्त करायचे असेल तर आधी डोक्यातील दुष्काळ दुर करावा लागणार आहे.

सरकारपेक्षा समाजाला पाण्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. राज्य आणि समाजाने पाण्यासाठी मिळुन काम केले पाहीजे.

पाण्याचा सम्मान करून त्याचे समाधान शोधले गेले पाहीजे. महाराष्ट्रात माणुस जितका पॉवरफुल तीतकेच तो पीकही पॉवरफुल घेतो.

त्यामुळे पाण्याची कमतरता भासते. पावसाच्या चक्रानुसार पीकचक्र ठरवले गेले पाहीजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी पोपटराव पवार सारख्यांची गरज आहे.

राज्याने 48 जलयोध्दा, 2000 जलदुत, 48 हजार जलसेवक नेमले आहे. या सर्वांच्या माध्यमातुन जळगावातुन जलसाक्षरतेचा प्रारंभ केला पाहीजे.

शेती ही एकमात्र जिवनधारा आहे. जळगाव जिल्हा पाणीदार करण्यासाठी पाण्याचे महत्व समजुन घ्या, पाण्याविषयीची जलसाक्षरता निर्माण करा, पाण्याचा सांभाळ करा आणि पाण्याची लुट करणार्‍यांविरूध्द सत्याग्रह पुकारा असे आवाहनही जलतज्ञ राजेंद्रसिंह यांनी शेवटी केले.

परीषदेचे सुत्रसंचालन प्रा. रामचंद्र पाटील यांनी तर आभार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

*