एक लाख 66 हजार शेतकर्‍यांना लाभ होण्याची शक्यता !

0

चेतन साखरे,जळगाव / शेतकरी संपाच्या पार्श्वभुमिवर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभुधारकांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानुसार जिह्यातील 1 लाख 66 हजार शेतकर्‍यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान यासंदर्भात जिल्हा बँकेने शासनाला शेतकरी संख्या आणि थकबाकीची माहिती पाठविली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

कर्जमाफी आणि हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी दि. 1 जुनपासुन संप पुकारला होता. काल मध्यरात्री मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकरी संघटनांच्या प्रतिनीधींची बैठक झाली.

यात 70 टक्के मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करीत अल्पभुधारक शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानुसार कर्जमाफी झाल्यास जिह्यिातील 1 लाख 66 हजार843 अल्पभुधारक शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

एक लाखापर्यंतच्या कर्जाची माहिती मागविली
जिल्हा बँकांकडुन एक लाख रूपयांपर्यंतच्या कर्जाची माहिती मागविण्यात आली आहे. तसेच अल्पभुधारक शेतकरी संख्या व त्यांचे कर्ज याबाबत जिल्हा बँकेनेही शासनाकडे माहीती पाठविली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

676 कोटीच्या कर्जमाफीची शक्यता
जिल्ह्यातील अत्यल्प भुधारक असलेले 95 हजार 948 तर अल्पभुधारक असलेले 70897 शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांकडुन 676 कोटी 60 लाख 36 हजार रूपये येणे आहे. त्यामुळे कर्जमाफी झाल्यास 1 लाख 66 हजार 843 शेतकर्‍यांचे 676 कोटी 60 लाख रूपये कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकरी मुख्यमंत्र्याच्या आश्वासनाकडे पुन्हा आशेने पाहु लागला आहे.
तालुका
अत्यल्प भूधारक
अल्पभूधारक

अमळनेर
7655
4730

भडगाव
7015
2318

भुसावळ
2248
1463

बोदवड
4569
4067

चाळीसगाव
14332
6348

चोपडा
5599
5150

धरणगाव
4477
3635

मुक्ताईनगर
5450
4213

एरंडोल
3473
3837

जामनेर
8753
12736

पाचोरा
8544
6957

पारोळा
8183
8140

रावेर
6142
2186

यावल
3860
2233

जळगाव
5648
2884

एकूण
95948
70897

LEAVE A REPLY

*