पाण्याची काटकसर, संरक्षण आवश्यक

0
जळगाव  / गेल्या दोन- तीन वर्षापासून राज्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. पाण्याचे नियोजन केल्यास आपण दुष्काळावर मात करून शकतो.
त्यामुळे पाण्याची काटकसर व संरक्षण करणे गरजेचे असल्याचा सूर मान्यवरांनी पाणी परिषद व स्वच्छ भारत अभियान कार्यशाळेत व्यक्त केला.
तसेच जलयुक्त शिवार अभियान दुष्काळमुक्तीसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा आशावाद देखील मान्यवरांनी व्यक्त केला.
जिल्हा प्रशासनानातर्फे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेला जागतिक जलतज्ञ राजेंद्रसिंह, जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे, कोल्हापूर येथील स्वच्छता दूत भारत पाटील, हिवरे बाजार येथील सरपंच पोपटराव पवार या मान्यवरांनी कार्यशाळेत मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेला महसुल विभाग, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, सरपंच यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोपटराव पवार यांच्या आपले आदर्श गाव या मासिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

गावकर्‍यांना मुलभूत सुविधा देण्यात सरपंचांनी पुढाकार घ्यावा- पोपटराव पवार
विकासकामे ही केवळ आदर्श गावाचा मान मिळविण्यापुरती मर्यादीत न ठेवता गांवकर्‍यांना संपुर्ण मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी असावीत, त्यासाठी सरपंचानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. ते म्हणाले की, गावामध्ये कुर्‍हाडबंदी, चराईबंदी, नशाबंदी, नसबंदी आणि श्रमदान ही पंचसुत्री अंमलात आणल्यास गावाचा विकास कुणीच थांबवू शकत नाही.

जिल्हा हागणदारी मुक्त झाल्यास कार्यशाळा यशस्वी- स्वच्छतादूत भारत पाटील
स्वच्छ भारत अभियानासाठी आजही आपल्याला कार्यशाळा आयोजित करावी लागते, ही बाब खेदाची असल्याचे नमूद करुन स्वच्छतादूत भारत पाटील यांनी जिल्हा हागणदारी मुक्त झाला तरच ही कार्यशाळा यशस्वी होईल असे सांगितले. संपुर्ण जळगांव जिल्हा 100 टक्के हगणदारी मुक्त झाल्यास कार्यशाळेचे खर्या अर्थाने फलीत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यशाळेत सहभागी सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यात चैतन्य निर्माण होईल, असे विविध उदाहरणे देऊन स्वच्छतादूत भारत पाटील यांनी दाद मिळवली.

नागरिक घामाघुम
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दिक्षांत सभागृहात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सभागृहात काही ठिकाणीच कुलर लावण्यात आले होते. परंतु काही ठिकाणी कुलर, फॅन नसल्याने नागरिक चांगलेच घामाघुम झाल्याने तिसर्‍या व चौथ्या सत्रात नागरिकांची उपस्थितीत कमी झाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

*