पाण्याच्या व्यवहाराचे विश्लेषण होणे गरजेचे – डॉ.चितळे

0
जळगाव  / पाण्याचे व्यवस्थापन स्थलविशिष्ट आहे. त्यामुळे त्यादृष्टिने नियोजन होणे गरजेचे आहे. पाण्याच्या फेरवाटपाच्या व्यवस्था वाढल्या पाहिजे.
पाणी संपत्ती असून या पाण्याच्या व्यवहाराचे विश्लेषण होणे गरजचे असल्याचे मत जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हयातील पाणी समस्या, वाढते प्रदुषण, त्यामुळे वाढणारे तापमान व कमी होणारे पर्जन्यमान हा चिंतेचा विषय आहे.
पाणी अडविणे व जिरविण्याचे तसेच पुनर्भरणाच्या विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यासाठी पाणी परिषद व स्वच्छ अभियान या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ते बोलत होते. पाणी परिषद व स्वच्छ भारत अभियान या कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जागतिक जलतज्ञ राजेंद्रसिंह, कोल्हापूर येथील स्वच्छतादुत भारत पाटील, हिवेर बाजार येथील सरपंच पोपटराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. चितळे म्हणाले की, उद्योगाला दिल्या जाणार्‍या पाण्याचा पुर्नवापर करता येतो. परंतु शेतीला दिलेल्या पाण्याचा पुर्नवापर करता येत नाही त्यामुळे पाण्याच्या व्यवहाराचे विश्लेषण होणे आवश्यक आहे.
जिल्हयात वर्षाला 600 ते 700 मिलीलीटर पाऊस पडत असल्याने या पाऊसाच्या पाण्याच्या थेंबाथेंबाचे नियोजन होणे गरजचे आहे.
कमी पाण्यातून समृध्दी निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पाण्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली असून पाण्याची सुबध्दता टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे.

पाण्याचा कितीदा पूर्नवापर होतो यावर पाण्याची उपलब्धता निर्माण होणार आहे. त्यामुळे पाण्याची काटकसर, संरक्षण अधिक चांगल्या पध्दतीने कसे करता येईल, पुर्नवापर कसा करता येईल यासाठी विचारमंथन करण्याची गरज आहे.

पाण्याचा उपयोग एकमार्गी सिंचन पध्दतीने वाढला पाहिजे. गावाच्या उपजीविकेचे असलेल्या स्त्रोतांमधील पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजचे आहे.

त्यामुळे पाणी परिवर्तनाच्या दिशा शोधल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी पाण्याचे कुशल व्यवस्थापन रचना निर्माण करण्याची गरज आहे. पाण्याचे आधुनिक अद्यायवत व्यवस्थापन होणे गरजचे असल्याचेही मत डॉ. चितळे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*