प्रयागराजच्या कुंभमेळ्यातील शाही मिरवणुकीत फैजपूरच्या जनार्दन हरीजी, पुरुषोत्तम दास महाराजांचा सन्मान

0

अरुण होले |अलाहाबाद (प्रयागराज) ।  : मनात पुण्याची आस डोक्यावर आस्थाची गाठोडी घेवुन गंगा यमुना सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमक्षेत्री लाखो-कोट्यावधी भाविक प्रयागराज येथे एकत्र आलेले आहेत. या 2019 च्या कुंभमेळ्यात खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरूषोत्तमदा महाराज त्यांच्या असंख्य शिष्यगणासह प्रयाग मुक्कामी उपस्थित झाले आहेत.

जवळपास एक एकर परीसरात भव्य कुटीरस्थान सेक्टर नं.5 ओल्ड जी.टी.रोड पुल नं. 12, खाक चौक तुलसी आश्रम नावाने निर्माण केले आहेत. हजारो भक्तगण या आश्रमात मनात पुण्याची आस घेवून उपस्थित झाले आहेत. या भक्तगणात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, गुजराथ या राज्यांबरोबरच दक्षिणेकडील राज्यांतील भाविकही उपस्थित झाले आहेत.

 

दि. 5 जानेवारी रोजी ध्वजारोहण होवून या भव्य दिव्य, नयनरम्य धर्मसोहळ्यास सुरूवात झाली. लाखो भाविकगण 5 जानेवारी पासुनच प्रयागराज या तिर्थक्षेत्री सादर झाले. प्रयाग शहराला राम या काळात माहीतच नाही. रात्रंदिवस लाखो भाविक प्रयागक्षेत्रात डोक्यावर आस्थेचे गाठोडे घेवून गंगामाईच्या पवित्र घाटांवर मोक्षप्राप्तीसाठी मोठ्या श्रध्देने डुबकी घेण्यास उत्सुक होते.

लाखो भाविकांनी गंगा यमुना सरस्वतीच्या पवित्र संगमावर होते. या कुंभमेळ्यासाठी सकाळी 5 वाजता तुलसी आश्रमात भाविकांची वर्दळ सुरू होते, 5 वाजता चहापान होऊन धर्मचर्चेची सुरूवात भाविकांत सुरू होते. 11 वाजेपासुन महाप्रसादाला सुरूवात होते. लाखो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. दुपारी भागवत कथा सुरू होते. भागवत कथा संपल्यानंतर रामकथेची महामंडलेश्वर पुरूषोत्तमदास सुरूवात करणार आहेत.

मंगळवार दि. 15 रोजी होणार्‍या या महापर्वात सामिल होण्यासाठी देशभरातून श्रध्दाळू उपस्थित झाले आहे. 95 स्थानांवर पार्कीगची सुविधा करण्यात आली आहे. 22 पुल भाविकांना संगमावर जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 375 कि.मी. लांब सडकांचे जाळे भाविकांसाठी निर्माण करण्यात आले आहे.

18 सेक्टरमध्ये भाविकांसाठी तसेच संत महंतासाठी स्नानासाठी घाट निर्माण करण्यात आले आहे. हजारो सुरक्षा रक्षक भाविकाना कोणताही त्रास होवू नये म्हणून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा करीत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासन सतर्क आहे.

फैजपूर येथील दोन महामंडलेश्वराची नायाब पेशवाई निघाली. यासाठी लाखो भाविक हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. यामध्ये फैजपूर सतपंथ मंदिराचे महामंडलेश्वर जनार्दनहरी महाराज, स्वामी जगन्नाथ धाम ट्रस्टतर्फे आणि तुलसी आश्रम बडा हनुमान खालसातर्फे श्री महामंडलेश्वर पुरूषोत्तमदा महाराज, खंडोबा देवस्थानचे गादीपती यांचीही पेशवाई मोठ्या भावपुर्ण वातावरणात नायाब पेशवाई निघाली.

शहरापासून तर संगमाच्या वाळवंटापर्यंत मोठी शोभायात्रा प्रेक्षकांच्या, भाविकांच्या व शहरवासियांच्या डोळ्याचे पारणे फिरविणारी ठरली. भारतातून असंख्य नागा साधू तसेच महामंडलेश्वर जगतगुरू, संत महंत, भाविक, भक्तगण तसेच प्रेक्षक परदेशी नागरीक या सोहळ्यात समाविष्ट झाले आहेत. 19 फेब्रुवारी पर्यंत हा सोहळा संपन्न होत आहे.

LEAVE A REPLY

*