मुलीवर अत्याचार करणार्‍या पित्याला जन्मठेप

0
अमळनेर, | प्रतिनिधी :  स्वतःच्या १० वर्षाच्या मूलीला कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार करणार्‍या पित्याला येथील जिल्हा सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सूनावली.

६ ऑक्टोंबर २०१५ रोजी नरवाडे (ता.चोपडा) येथील या संतापजनक घटनेतील पित्याला न्या. दिनेश कोठलीकर यांनी सबळ साक्षी पूराव्यावरून हि शिक्षा सूनावली.

याबाबत सरकारी वकील ऍड. किशोर बागूल. मंगरूळकर यांनी सांगीतलेली घटनेची माहिती अशी, की दयाराम नवलसिंग भिल (वय २८, रा नरवाडे ता.चोपडा) याचे कौटुंबिक कारणावरून पत्नीशी खटके उडाल्याने ती आपल्या १० वर्षाच्या मूलीला पती दयारामजवऴ सोडून माहेरी निघून गेली होती.

दि.६ ऑक्टोंबर २०१५ रोजी रात्री ९ वाजता आपली पोटची १० वर्षाची मुलगी झोपडीत झोपलेली असतांना दारूच्या नशेत रात्री दोन ते ३ वेळा कोयत्याचा धाक दाखवून शारीरीक अत्याचार केला, त्या मूलीला त्रास जाणवत असल्याने तिने सकाळी काकू जानकाबाई बारेला यांना हा प्रकार सांगितला.

त्यांनी गावातील सरपंच लीलाबाई भिल व पो. पा. वैशाली धनगर यांचे मदतीने पोलीसात तक्रार दिली. त्यावरून दयाराम भिल विरूध्द बलात्कार व लैंगिक अत्याचार अधि.२०१२ च्या कलम ५व ६पोक्सो कायद्याने गून्हा दाखल करून दि. ७ रोजी अटक केली.

या घटनेचा तपास पो. नि. कैलास वाघ यांनी करून जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल झाला. या दरम्यान १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यात ङ्गिर्यादी सरपंच लीलाबाई भिल, पो. पा. सौ वैशाली धनगर, डॉ.स्नेहल भामरे, उप जिल्हा रूग्णालयाचे डॉ पंकज पाटील, पिडीत मूलगी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

न्यायालयात आरोपीविरूध्द धाक दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी सबळ साक्षी पूरावे आढळून आल्याने न्या. दिनेश कोठलीकर यांनी जन्मठेप, २ वर्षाची शिक्षा व ६ हजार रुपये एकत्रीत दंड ठोठावला आहे.

LEAVE A REPLY

*