तळेगाव येथे दारु भट्टी उद्ध्वस्त

0
चाळीसगाव, | प्रतिनिधी :  तालुक्यातील तळेगाव येथे अवैधरित्या सुरु असलेली गावठी दारुची हातभट्टी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी उद्ध्वस्त केली. तयार गावठी दारु व दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे व पक्के रसायन असा एकूण ४२ हजार २७५ रुपयांचा माल पोलीसांनी जागेवर नष्ट केला.

तळेगांव शिवारातील एका शेतात गेल्या अनेक दिवसांपासून अशोक धोंडीराम मोरे हा गावठी दारु तयार करत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना मिळाली, त्याअनुषंगाने पोलीसांनी त्याठिकाणी कारवाई केली असता गावठी दारु तयार करण्यांचे कच्चे व पक्के रसायन, तयार दारु असा एकूण ४२ हजार २७५ रुपयांचा माल पोलीसांना मिळुन आला.

पोलीसांनी दारु भट्टी तात्काळ उद्ध्वस्त करुन, आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पोकॉ. विनोद विठ्ठल भोई यांच्या फिर्यादीवरुन अशोक धोंडीराम मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. मनोहर जाधव करीत आहेत.

पथकात स्वत: पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोहेकॉ. मनोहर जाधव, पोहेकॉ श्यामकांत बोरसे, पोना.विनोंद भोई, पोकॉ. नितेश पाटील, पोकॉ.गणेश पवार यांचा समावेश होता.

दरम्यान चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्यावतीन देखील शहारातील नागद रोड स्थित पाण्यांच्या टॉकीजवळ अवैरित्या देशी दारु विक्री करताना एकावर कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातून ७८० रुपये किमतीच्या १५ टॅगो पंचच्या दारु बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहे.

याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गोपाल बेलदार यांच्या फिर्यादीवरुन अरुण श्रीपत कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास अरुण पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

*