हॉटेल सनराईजचा वापर अनधिकृत : सुनावणीनंतर नगररचना विभागाने दिला निकाल

0
जळगाव |  प्रतिनिधी : रामानंदनगर परिसरातील हॉटेल सनराईजबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती.या तक्रारीवरुन नगररचना विभागाने सुनावणी घेवून हॉटेलचा वापर अनधिकृत असल्याचा निकाल दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

रामानंदनगर परिसरात रात्री अनेकवेळा भांडण होवून हाणामारीसारख्या घटना घडत असतात. त्यामुळे परिसरातील हॉटेल सनराईज बंद करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, यासाठी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली होती.

त्यानंतर स्वाक्षरी मोहीम राबवून जिल्हाधिकार्‍यांना देखील निवेदन दिले होते. प्राप्त झालेल्या तक्रारीचे अनुषंगाने अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती.

याप्रकरणी नगररचना विभागाकडे सुनावणी झाली. सुनावणीअंती हॉटेलचा वापर अनधिकृत असल्याचा निकाल दिला आहे. तसेच मनपा प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबत माहिती दिली असून पुढील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*