पोलीस बंदोबस्ताअभावी हॉकर्स स्थलांतर प्रक्रिया बारगळली

0

जळगाव |  प्रतिनिधी :  ख्वॉजामियॉं झोपडपट्टीच्या जागेवर हॉकर्सला स्थलांतरीत करण्यासाठी मनपा प्रशासनाने पोलीस बंदोबस्त मागविला होता. परंतु पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने दुसर्‍यांदा पुन्हा स्थलांतरची प्रक्रिया बारगळली.

शहरातील बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजी रोडवरील हॉकर्सला ख्वॉजामियॉ झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला.

त्यानुसार महासभेत ठराव देखील करण्यात आला आहे. स्थलांतर प्रक्रिया करण्यासाठी ७८२ हॉकर्सधारकांची जागा सोडत द्वारे निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने स्थलांतराची कार्यवाही करण्यास सुरुवात केली होती. मात्र वाद होवून तणाव निर्माण झाल्याने प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्या

नंतर प्रशासनाने आज स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पोलीस बंदोबस्तसाठी मनपा प्रशासनाने पत्र दिले.

परंतु सध्या शेतकर्‍यांचा संप सुरु असल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्त नाकारला. संप मिटल्यानंतर पोलीस बंदोबस्त दिला जाईल. असे पोलीस प्रशासनाने मनपा प्रशासनाला सांगितले.

अतिक्रमण विभागाचे पथक सकाळीपासून होते ठाण मांडून

बळीरामपेठ, सुभाष चौक, शिवाजीरोड वरील हॉकर्सधारकांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र पोलीस बंदोबस्त नाकारल्याने स्थलांतर प्रक्रिया पुन्हा बारगळली.

दरम्यान, अतिक्रमण विभागाचे पथक सकाळपासूनच बळीरामपेठ, सुभाषचौकात ठाण मांडून होते. त्यामुळे दुपारपर्यंत याठिकाणी शुकशुकाट होता. दुपारनंतर हॉकर्सधारकांनी दुकाने थाटली होती.

LEAVE A REPLY

*