वाळू ट्रॅक्टर मालकाची तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी

0
जळगाव | प्रतिनिधी  :  तलाठयाने वारंवार वाळुचे ट्रॅक्टर पकडल्याने ट्रॅक्टर मालकाने तलाठयाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.१ रोजी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मागील आठवड्यात आव्हाणे येथील तलाठी मनोहर बाविस्कर यांनी शिवसेनेचे कुलभुषण विरभान पाटील यांचे डंपर पकडले होते.

त्यानंतर पुन्हा बाविस्कर यांनी पाटील यांच्या मालकीचे वाळुचे टॅ्रक्टर पकडले. याचा राग आल्याने पाटील यांनी तालुका पोलिस स्टेशनच्या समोरील रस्त्यावर बाविस्कर यांना माझे ट्रॅक्टर पुन्हा का पोलिस स्टेशनला आणले? तु कस काय येथे राहतो? तुला रडायला दिवस पुरणार नाही ? तुला पाहुण घेईल असे बोलून टॅ्रक्टर मालक भुषण विरभान पाटील यांनी तलाठी मनोहर बाविस्कर यांना धमकी दिली.

याप्रकरणी बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालक कुलभुषण पाटील यांच्याविरुध्द तालुका पोलिसात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतुक करणार्‍यावर कारवाई

जिल्हा महसुल विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने अवैध वाळु वाहतुक करणार्‍यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. महसुल विभागाच्या पथकाने पिप्रांळा हुडको परिसरातून अवैध वाळु वाहतुक करणार्‍या टॅ्रक्टरवर कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केले आहे.

याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नदी पत्रातून अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

पिंप्राळा हुडको मार्गे ट्रॅक्टर शहरात येत असतांना आव्हाण्याचे तलाठी मनोहर शिवराम बाविस्कर यांनी ट्रॅक्टर थांबवून चालकांकडे पावत्यांची मागणी केली.

त्यांच्याजवळ पावत्या न मिळून आल्याने ट्रॅक्टर चालक नितीन किसन कुंभार रा. पिंप्राळा यांच्या विरुध्द तलाठी मनोहर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ संभाजी पाटील करीत आहे.

LEAVE A REPLY

*