शेतकर्‍यांची कर्जमुक्ती व दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळण्यासाठी शिवसेनेने पाळधीत रस्ता रोखला

0
जळगाव |  प्रतिनिधी : राज्यातील हतबल झालेल्या शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळावी, शेतकर्‍यांना दरमहा ३००० हजार मानधन मिळावे व शेतकरी हिताचे निर्णय घेण्याबाबत शासनास भाग पाडण्यासाठी  पाळधी बायपास येथे धरणगाव तालुका शिवसेना,युवासेना व महिला आघाडीतर्फे रस्ता रोखण्यात आला.

यावेळी दोन्ही दिशेने येणारी वाहतूक बर्‍याच वेळेपर्यंत ठप्प झाली होती.

शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, जि.प. सदस्य प्रताप पाटील,पं.स.सभापती सचिन पवार, उपसभापती प्रेमराज पाटील,युवासेनेचे आबा माळी, अनिल कासट, महिला आघाडीच्या महानर प्रमुख शोभा चौधरी व जना पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आला.

शेतकर्‍यांना कर्जमुक्ती व पेन्शन मिळालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. रास्तारोको वेळी मंडळ अधिकारी आशिष वाघ यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, शेतकर्यांना ३००० हजार रुपये दरमहा वेतन मिळावे, सुरु असलेली शेतीचे भारनियमन बंद करावे,धरणगाव शहर व तालुक्यातील बंद असलेले ए.टी.एम. सुरु करण्यात यावेत. धरणगाव पशु वैद्यकीय दवाखान्यात कायम स्वरूपी डॉक्टरांची नेमणूक करावी, शेतकर्यांना मिळणार्‍या कर्जाची मर्यादा वाढवून देण्यात यावी,उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करावा,खते व बी बियाणे अल्पदरात मिळावी अश्या मागण्याचा निवेदनात समावेश आहे.

रास्तारोको प्रसंगी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख मोतीलाल पाटील, पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे,पिंटू कोळी,प्रमोद परदेशी,भिला रोकडे,प्रकाश पाटील,सरपंच राजू बडगुजर,शरद पाटील,अलीम देशमुख,हर्शल पाटील,दानिश खान,आबा महाजन,दीपक श्रीखंडे,मुकेश भोई,ज्योती शिरोदे,अमान शेख,अरुण पाटील,भूषण पाटील,सागर पाटील,समाधान वाघ,विक्रम पाटील,बंटी नन्नवरे,आसाराम कोळी,दीपक सावळे,मिलिंद नन्नवरे यांच्यासह शिवसेना युवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सरपंच ग्राम पंचायत सदस्य व शिवसैनिकांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*