Blog : लष्करप्रमुखांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ

0
गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तानने काश्मीरमध्ये ‘डर्टी वॉर’ सुरू केले असून या हिंसाचाराचा सामना करणार्‍या जवानांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही, असे मत भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी अलीकडेच केले आहे.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका लष्करप्रमुखाने असे वक्तव्य केले आहे. याचे कारण आता भारताच्या, भारतीय लष्कराच्या सहनशीलतेचा अंत होत आहे.

गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान काश्मीरमध्ये एक ‘डर्टी वॉर’ खेळत आहे. यामध्ये सीमेपलीकडून दहशतवादी पाठवणे आणि त्या माध्यमातून काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणे, असे प्रकार घडत आहेत. आजवर या दहशतवादी हिंसाचारामध्ये अनेक जवान मृत्युमुखी पडले आहेत.

आपण किती जवान गमवायचे याला काही मर्यादा आहेत की नाहीत, असा सवाल लष्करप्रमुखांनी केला आहे. खोर्‍यातील जनता आमच्या जवानांवर दगडफेक करते, पेट्रोबॉम्बचा वर्षाव करते. अशावेळी माझ्या जवानांनी काय करू, असे विचारले तर मी त्यांना ‘वाट बघा आणि मरा’ असे सांगू शकत नाही.

तुमच्यासाठी शवपेट्या तयार करून ठेवल्या आहेत, त्यात तुमचे मृतदेह फुलांनी सजवून तुमच्या मूळ गावी पाठवेन, असे मी त्यांना सांगू का? लष्करप्रमुख म्हणून मला माझ्या माणसांचे मनोबल उंचवण्यासाठी आवश्यक ते सर्व करणे भागच आहे. घुसखोरी व सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया थांबवायलाच हव्यात.

सुटीवर असलेला तरुण लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फय्याज दहशतवाद्यांकडून मारला जातो तेव्हा लोक आवाज का उठवत नाहीत, असा सवालही लष्करप्रमुखांनी केला.

लष्करप्रमुखांचे हे उद्विग्न सवाल खरोखरीच विचार करायला लावणारे आहेत. मुळातच बिपीन रावत यांचे हे वक्तव्य कोणत्या पार्श्‍वभूमीवर केले गेले होते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. काश्मीरमधील तरुणांकडून होणार्‍या दगडङ्गेकीचा संदर्भ या वक्तव्याला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये दगडङ्गेक सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीनचा काश्मीरमधील म्होरक्या बुरहान वाणीला मारल्यानंतर या दगडङ्गेकीला सुरुवात झाली.

काश्मीरमध्ये सीआरपीएङ्गचे ६६ हजार जवान गस्त घालत आहेत. त्यांना सातत्याने आणि नित्यनेमाने या दगडङ्गेकीचा सामना करावा लागतो आहे.

२०१६ मध्ये ६ हजार जवान दगडङ्गेकीमध्ये जखमी झाले आहेत. त्यापैकी ३५० जवान गंभीर जखमी झाले आहेत. जगामध्ये कुठेही असा प्रकार घडताना दिसत नाही.

सातत्याने दगडङ्गेक होऊनही भारतीय सैन्य प्रचंड सहनशक्ती दाखवत आहे. सध्या काश्मीरमध्ये लष्कराकडून जी कारवाई केली जात आहे त्याला पीपल ङ्ग्रेंडली ऑपरेशन म्हणतात. त्यामुळेच हे जवान दगडङ्गेक निमूटपणे सहन करत आहेत. त्यामध्ये लष्कराचे प्रचंड नुकसान होत आहे. म्ह

णूनच बिपीन रावत यांनी या लोकांनी आमच्यावर दगडफेक करण्याऐवजी शस्त्रे चालवली तर मला जास्त आनंद होईल. कारण त्यामुळे आम्हाला जे करायचे आहे ते करता येईल. दगडङ्गेक करणार्‍यांनी गोळ्यांचा वापर करावा, असे म्हटले आहे.

काश्मीरमधील नागरिकांना संरक्षण देणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे लष्कराचे उद्दिष्ट आहे. पण कायदा सुव्यवस्थेच्या आड कोणी येत असेल आणि लष्कराची जबाबदारी पार पाडण्यात अडथळा येत असेल तर आम्ही निश्‍चितपणे दयामाया दाखवणार नाही, हेही रावत यांनी स्पष्ट केले आहे.

काश्मीरमध्ये २०० दहशतवादी लपून बसलेले आहेत. त्यामध्ये ६१ स्थानिक दहशतवादी आहेत. हे स्थानिक दहशतवादी दगडङ्गेक करणार्‍यांच्या आडून लष्करावर ग्रेनेडने हल्ला करतात.

या दहशतवाद्यांची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे ते लष्करावर हल्ला करतात आणि दुसरीकडे स्थानिक काश्मिरी लोकांवरही हल्ले करतात.

त्यातून सैन्याविषयी काश्मिरी जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण होतो. हे हल्ले लष्कराने केले आहेत, असे दर्शवले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे या दगडङ्गेकीच्या घटनांमुळेच अलीकडेच ९ दहशतवाद्यांना पळून जाण्यात यश मिळाले होते. त्यांना पकडणे दगडङ्गेकीमुळे शक्य झाले नाही.

काश्मीरमधील दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र, दारुगोळा पुरवणे, आसरा देणे, पळून जाण्यास मदत करणे, त्यांना मानवी संरक्षण देणे या सगळ्या गोष्टी काश्मीरमधील काही स्थानिकांकडून केल्या जात आहेत. ही दगडङ्गेक दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केली जाणारी दगडङ्गेक आहे.

दगडङ्गेकीच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर दगडङ्गेक करणारे आणि दहशतवादी यांच्यात ङ्गरक केला जाणार नाही.

लष्कराच्या दृष्टीने दगडफेक करणारे आणि दहशतवादी हे एकच असतील आणि दहशतवाद्यांवर ज्या प्रकारे कारवाई करतो आहोत तशीच दगडङ्गेक करणार्‍यांवरही कारवाई केली जाईल, असे रावत यांनी म्हटले आहे.

सध्याची काश्मीरमधील परिस्थिती आणि रावत यांनी दिलेला संदेश या दोन्हीला एक संदर्भ आहे. तो संदर्भ पाकिस्तानशी निगडीत आहे. काश्मीरमध्ये होणार्‍या दगडङ्गेकीला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा पाठिंबा आहे. हा सर्व कट पाकिस्तानकडून शिजवला जात आहे.

पाकिस्तान तीन माध्यमातून हे डर्टी वॉर खेळत आहे. पहिले म्हणजे काश्मीरच्या प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयकरण करणे. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून काश्मीरप्रश्‍न पाकिस्तानकडून मांडला जात आहे.

हा प्रश्‍न किती स्ङ्गोटक बनला आहे हे जगाला सांगून त्यामध्ये जागतिक समूहाला हस्तक्षेप करायला लावण्याची पाकिस्तानची रणनीती आहे. दुसरा मार्ग म्हणजे शस्रसंधीचे उल्लंघन करून सीमापार गोळीबार करणे आणि तिसरा मार्ग म्हणजे सीमापार दहशतवाद पसरवणे.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणार्‍या सुमारे ४२ प्रशिक्षण शिबिरांमधून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यांना भारतात घुसवून येथे हिंसाचार घडवून आणला जात आहे.

मोदी सरकार आल्यानंतर हे तीनही प्रयत्न ङ्गोल ठरताहेत. सीमापार दहशतवादी घुसवणे अवघड झाले आहे. भारतीय लष्कर गोळीबाराला चोख आणि करारी प्रत्युत्तर देत आहे.

दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान वेगळा पडल्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून काश्मीरचा प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो आहे.

त्यामुळे आता पाकिस्तानने ही नवी रणनीती आखली आहे. काश्मीरमधील स्थानिकांना हाताशी धरून त्यांनाच उठाव करण्यास भाग पाडले जात आहे. स्थानिकांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी दगडङ्गेकीला प्रोत्साहन दिले जात आहे.

त्यामुळे काश्मीरमधील दगडङ्गेक ही उत्स्ङ्गूर्त नसून पाकिस्तान प्रायोजित आहे. जनरल बिपीन रावत यांचा संदेशही काश्मीरसाठी नसून दगडङ्गेकीला प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसाठी होता.

त्यामुळे या वक्तव्यांचा विपर्यास होऊ नये. रावत यांनी दिलेल्या इशार्‍यामधून दगडङ्गेकीविषयक लष्कराची भूमिका काय असेल ते स्पष्ट होते आहे.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका लष्करप्रमुखाने अशाप्रकारचे वक्तव्य केले आहे. याचे कारण आता भारताच्या, भारतीय लष्कराच्या सहनशीलतेचा अंत होत आहे.

त्यामुळे दगडङ्गेक करणार्‍यांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारनेही लष्करप्रमुखांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. याचा अर्थ त्यांच्या भूमिकेला सरकारची सहानुभूती आहे. भारतीय जनमानसाचे प्रतिबिंब यात उमटते आहे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर

LEAVE A REPLY

*