महात्मा बसवेश्‍वर वीर शैव धर्माचे पुनरुज्जीवन करणारी विभूती – विनायक कोष्टी

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  वीर शैव धर्माचे पुनरुज्जीवन करणारी महान विभूती म्हणजे महात्मा बसवेश्‍वर असल्याचे प्रतिपादन विनायक कोष्टी यांनी केले.

येथील नाईक हॉलमध्ये हातमाम विणकर कोष्टी समाज सेवा मंडळातर्फे दि. २८ रोजी सायंकाळी आयोजित बसवेश्‍वर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ गायकवाड होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रमेश देवराम खिस्ते, विनायक कोष्टी, पत्रकार लाला कोष्टी, प्रवीण घोडके, महेश पिठले उपस्थित होते.

प्रास्ताविक समाज सेवा मंडळाचे अध्क्ष विनयकुमार कोष्टी यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.या निमित्ताने डी.एस. हेलोडे यांचे‘सामाजिक ऐक्य हिच समाजिक प्रगती’या विषायावर व्याख्यान झाले.

त्यातून त्यांनी समाजाने एकत्र येऊन कार्य केल्यास समाजाची प्रगती शक्य असल्याचे सांगितले. यावेळी जगन्नाथ गायकवाड व उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, अध्यक्ष विनयकुमार कोष्टी यांनी मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांचा परिचय सौ.सरोज कोष्टी,माधव गरुडे, सोनाली कोष्टी यांनी केला.सूत्रसंचालन माधुरी गरुडे यांनी केले. आभार प्रदर्शन राजेश कोष्टी यांनी मानले.

यशस्वीतेसाठी सतीष घोडके, संतोष विनंते, दीपक विनंते, अशोक कोंगे,दीपक कस्तुरे, मुकेश कोष्टी,अमोल कोष्टी, स्वप्नील कोंगे,अविनाश सरवदे, अभिषेक घोडके, सौ.प्रतिभा घोडके, सौ. रंजना आमोदे, मयुर कानडे, रवींद्र भदाने, राम घोडके, निखिलेश सरवदे, तुषार निराळे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*