Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

नवरात्रोत्सवात स्त्री भ्रुण हत्या विरोधात महिलांमध्ये जागर व्हावा

Share
चुल आणि मुल निसर्गाने महिलेला दिलेली शक्ती आहे. परंतु यातच न गुरफटता महिलांनीही घराबाहेर कर्तृत्व गाजवावे. आज महिलांसाठी विविध क्षेत्रात 50% जागा राखीव आहेत. परंतु चुल आणि मुल यांच्यात अडकल्याने त्या हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही.अशावेळी प्रत्येक पुरूषांनी आपल्या पत्नीला साथ द्यावी.

महिलांचा विकास म्हणजे त्यांना सर्व सुखसुविधा देणे नव्हे, तर त्यांनाही त्यांच्या कौशल्यनुसार कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देणे होय.सध्याची परिस्थिती पाहता ‘बेटी बचाव बेटी पढावो’ याप्रमाणे नवरात्रोत्सवात महिलांनी एकत्र येत स्त्रीभ्रूण हत्या व होणार्‍या अत्याचारविरोधात आवाज उठविला पाहिजे. वेळप्रसंगी दूर्गेचे रूपही घेण्यास मागेपुढे पाहू नये.

स्त्रीभ्रूण हत्या, मुलींची होणारी छेडखानी ,हूंड्यांसाठी होणार्‍या छळवादाचा आता अंत करण्याची वेळ आली आहे. जेथे जेथे महिलांवर अत्याचार, अन्याय होत असतील तेथे सर्व महिलांनी जातीपाती, धर्मभेद न पाहता एकत्र येत त्या अन्यायाविरोधात लढा द्यावा.

अन्याय करणार्‍यापेक्षा तो सहन करणे चुकीचे आहे.त्यामुळे अन्याय सहन करण्याची मानसिकता आता बदलावी. स्त्री शक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केवळ घर आणि दार न बघता स्त्रीयांनी आपले हित लक्षात घेऊन सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात गरूड झेप घ्यावी

.- सौ. निता रामेश्वर पाटील, प्रथम लोकनियुक्त सरपंचा, पहूर पेठ ता.जामनेर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!