Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

पुरूषांसोबतच स्त्रीयांनीच स्त्रीयांना समजुन घेण्याची गरज

Share
शारीरिक रूपाने स्त्री पुरुषांची बरोबरी करू शकत नाही हे स्त्रीचं वैशिष्ट्ये झालं. केवळ या गोष्टीमुळे पुरुषाने तिच्यावर हक्क गाजवावा असं होत नाही. तिची थट्टा करणे किंवा तिला चिडवण्याऐवजी तिला समजून घेतलं तर मानसिक रूपाने निश्चितच तिला सोपे जाईल.

स्त्री पुरुष समानता, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती या जागरूकतेमुळे हल्ली आणखी गोंधळ होऊन बसला आहे हा गोंधळ का उडाला असावा, याचे केवळ एकच कारण की आधीच्या काळात स्त्रियांबरोबर झालेले अत्याचार. त्या स्त्रीया अत्याचार, अपमानाच्या बळी पडल्या नसता तर आजच्या स्त्रीयांना उंबरठा ओलांडण्याची वेळच आली नसती.

आजही पुरुषाने कमावून आणले असते आणि स्त्रीयांनी घर सांभाळत गोडीगुलाबीने संसार मांडला असता. आज स्त्री स्वातंत्र्यासाठी बाहेर पडली. हे बाहेर पडल्यावर घरगुती कामांचा ताण कमी झाला असेतर मुळीचंच नाही उलट शारीरिक आणि मानसिक ताण वाढलाच आहे. पुरूष तर आजही नोकरी करून आल्यावर दमतो. पण बाई मात्र खंबीरपणे स्वयंपाकघरात उभी रहाते. एकूणच स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे गरजेचं होतं.

असो, स्त्रियांना पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे ही इच्छा असली तरी याहून अधिक गरज आहे स्त्रीयांनी स्त्रियांना समजून घेण्याची.

– प्रियंका रविंद्र पाटील, वेलनेस कोच, गुड मॉर्निंग वेलनेस अ‍ॅन्ड न्युट्रीशन वर्ल्ड , अमळनेर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!