Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

आत्मसन्माची ज्योत हाती घेण्याची गरज

Share
‘स्त्री काय आहेस तू आजच्या युगाची प्रगती तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू कलेच्या क्षेत्रात नटराजाची मूर्ती तू ’खरच सार्‍यांच्या यशाची किर्ती तू हे सार्मथ्य प्रत्येक स्त्रीने स्वतःच ओळखल तर सुदृढ समाजाची निर्मिती नक्की होईल .

आज ज्या महिला उच्च पदावर आहेत त्या आत्मविश्वासाने समाजात वावरतांना दिसतात. पण आज ही समाजात एक स्तर असा आहे ज्यात महिला आत्मविश्वासाने वावरू शकत नाही. कारण एकच त्यांची परिस्थिती, त्यांना मिळणारं वातावरण ही परिस्थिती थोडया फार प्रमाणात बदलण्यासाठी बचत गट , महिला मंडळ प्रयत्न करतांना दिसतात. तरीही काही क्षेत्रात स्त्रीया पुढे येत नाही . यासाठी सक्षम महिलांनी एकत्र येऊन स्त्रीयांनी स्त्रीयांसाठी चालवलेले व्यासपीठ या संकल्पनेत अधिकाधिक महिला सहभागी होतील.

व्यक्त होणार्‍या फकत नोकरी करणार्‍याच महिला असतील असे न होता सर्व स्तरातील महिला सहभागी होतील. या उपक्रमातून महिलांना स्वयंची जाणीव होईल व खर्‍या अर्थाने सुदृढ समाजाची निर्मिती होईल. पूर्वी अशी म्हण प्रचलित होती की ‘शिकलेली आई घराघराला पुढे नेई ’ पण ती म्हण अशी करावीशी वाटते ‘अभिव्यकत होणारी आई कुटुंबाला पुढे नेई ’ म्हणजेच काय तर सक्षम आई, आदर्श समाजाचा कणा आहे असे म्हटले तर काही हरकत नाही. अभिव्यक्त होणारी आई कुटुंबाला आधार तर देतेच आणि कुटुंबातूनच समाजाचा पाया उभारते.

स्त्रीचे अस्तित्व , सार्मथ्य प्रत्येक स्त्रीला उमगले तर राष्ट्रनिर्मितिच्या कार्यात आजच्या स्त्रीचा वाट जिजांऊंपेक्षा कमी नसेल, अशीच आत्मसन्मानाची ज्योत प्रत्येक स्त्रीने हाती घेतली तर भारतीय संस्कृती अजुनच संवर्धित होईल.

– वैशाली किशोर पाटील ( विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघ नगर जळगाव )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!