उमवित आज पाणी परिषद

0
जळगाव / पाणी समस्या उद्भव, त्यामागील कारणे आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात विचारमंथन करुन ग्रामपातळीपर्यंत पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश पोहोचविण्यासाठी राज्याचे महसूल, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उद्या दि. 3 जून रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेत देशातील जलतज्ज्ञांसह जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सेवक सहभागी होणार आहेत. या परिषदेत पाणी बचत आणि स्वच्छ भारत अभियान या विषयी जाणीव जागृती केली जाणार आहे.
जिल्ह्यातील पाणी समस्या, वाढणारे तापमान व कमी होणारे पर्जन्यमान हा चिंतेचा विषय आहे. त्यावर मात करण्यासाठी पाणी अडविणे व जिरविण्याचे तसेच पुनर्भरणाच्या विविध उपाययोजनांवर विचारमंथन करण्यासाठी दि.3 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणी परिषदेचे आयोजन पदवी प्रदान सभागृह, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे करण्यात आले आहे.
या परिषदेस मागदर्शक म्हणून जागतिक जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, जलसिंचन आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. माधवराव चितळे, कोल्हापूरचे स्वच्छता दूत भारत पाटील, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार हे उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील, कुलगुरु प्रा.पी. पी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ना.उज्वला पाटील, महापौर नितीन लढ्ढा, खा.ए.टी. पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. अपुर्व हिरे, आ.स्मिता वाघ, आ.चंदूलाल पटेल, आ.एकनाथराव खडसे, आ.डॉ. सतिष पाटील, आ.संजय सावकारे, आ.हरिभाऊ जावळे, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, आ.राजूमामा भोळे, आ.शिरीष चौधरी, आ.उन्मेश पाटील, आ.किशोर पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेस जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*