तृतीय पंथींच्या अवहेलनेस पालक जबाबदार

0
भुसावळ / तृतीय पंथींच्या जीवनाला समाज नाही तर आई-वडीलच जाबाबदार आहेत.स्त्री-पुरुषांच्या चौकटी न मोडणार्‍या मुलांना आई वडिलांना अभिमानाय वाटायला आहे. तो आपल्या ढाच्यात नसल्यानचे त्याला प्रेम सन्मान देण्याची आवश्यकता आहे. तसे होत नसल्यो तृतीयपंथीच्या जिवनाची अवहेलना होत आहे.
स्त्री- पुरुष जन्माला येणे हि कुणाच्याही हातचे काम नाही ते नैसर्गिक आहे. मात्र याव्यतिरीक्त पुरुष असूनही स्त्री म्हणून जगण्याची इच्छा असते मात्र त्याला समाज स्त्री म्हणून जगू देत नाही, तृतीयपंथी म्हणजे काही अनैसर्गिक आहे, काही गेल्या जन्माचे पापाचे प्रायश्चित म्हणून आम्ही जन्माला आलो आहोत अशी पुरुषप्रधान समाजाची मानसिकता आहे.
तसे होत नसल्याने सद्या जे टाळ्यावाजवतांना दिसत आहे ते केवळ आई वडिलांनी समजून न घेलल्या मुळेच असल्याची खंत तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी व्यक्त केली.
त्या दि. 2 जून रोजी येथील कृष्णचंद्र सभागृहात आयोजित उत्कर्ष कलाविष्कार आयोजित स्व. नानासाहेब देविदास फालक स्मृती खान्देश नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
दिशा पिंकी शेख या बहुपेडी तृतीयपंथीय कवयित्री यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी आ. संजय सावकारे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, दिलीप पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, सुरेश पाटील, पंडीतराव सुरवाडे, खान्देश नाट्यमहोत्सव केंद्रीय समिती अध्यक्ष मोहन फालक, उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी उपस्थित होते.
जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी त्यांची मुलाखत घेतली. यात त्यांनी, आपल्या जीवनात आलेले अनुभव, समाजाकडून झालेली अवहेलना या घटना त्यांनी मुलाखतीतून व्यक्त केल्या.
आमच्या जात नावाची गोष्ट नाही, भूक हा आमचा धर्म आणि सुरक्षितता हिच जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच आई- वडीलांकडून मिळणारी वागणूक व समाजात होणारी अवहेलना यामुळे तीन वेळा आत्महत्येचाही प्रयत्न केला असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.
समजात जगतानना होणारी अवहेलना व पीडांमुळे अनेक वेळा घरुन पळून गेले. याकाळात आपल्याला तृतीयंथींचा अभ्यास कराता आला आणि यातूनच घर सोडून तृतीयपंथींच्या टोळीत सामिल होण्याचा निर्णय घेतला. टोळीत स्वातंत्र्य असल्याने कुुठलेही बंधन नसल्याने व उघडे पणानेे जगण्याची गोष्ट समोर आली.
हीजडा ही संस्कृती आहे याला प्राचिन इतिहास आहे.सामाजिक आवहेलनांनी अल्यसंख्यांकीत झालेल्या समुहाने उभारलीली ही कुटुंब व्यवस्था आहे. सख्या नात्यांनी पाठ दाखलिवल्यानंतर आम्ही या टोळीत (तृतीयपंथींचा समुह) आम्ही नाते शोधतो.
प्राचीन काळापासून धार्मिक लेबल लावून आमचा मनोरंजनासाठी वापर होऊ लागला. पिढ्यान पिढ्या आमच्यावर दैवीकरण लादण्यात आले. मात्र मुघल काळात कर निरीक्षक व जनानखाण्यात सुरक्षा रक्षक म्हणूनही तृतीयपंथीयांना मान मिळाला आहे.
मात्र ब्रिटीश राजवटीनंतर आमच्यावर भिक मागण्याची वेळ येऊन ठेपली, समाजात आमच्यासाठी असलेल्या असुरक्षितते मुळे आक्रमक वागावे लागले, आक्रमक वागणे हेच आमचे सुरक्षा कवच असल्याचेही दिशा शेख यांनी आपल्या मुलाखतीद्वारे स्पष्ट केले.
सुत्रसंचालन प्रियंका साळी व सुशिल पाटील यांनी केले, तर प्रास्तविकात अनिल कोष्टी यांनी उत्कर्षच्या नाट्यचळवळीबद्दल आढावा सादर केला. आभार स्वरदा गाडगीळ यांनी मानले.
‘बैल मेलाय’ – महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आविष्कार, मुंबई निर्मिती ‘बैल मेलाय’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. युगंधर देशपांडे लिखित आणि ललित प्रभाकर यांनी ‘बैल मेलाय’चे दिग्दर्शन केले.
जगाच्या सुरुवाती पासून स्थलांतरण हा मानवी जीवनाचा भाग आहे.बहुतेक वेळी ग्रामीण लोक चकचकीत शहरी जीवनाकडे आकर्षित होतात.
शहरातील सर्वात वेगवान जीवन आणि अनागोंदीपासून ह्या नाटकाला सुरुवात होते.अचानक एक अनोळखी व्यक्ती येतो आणि त्या जोडप्याला त्यांच्या भविष्याबद्दल सांगू लागतो.
वेतनवाढ, पदोन्नती, व्यसनाधीन, विवाहबाह्य संबंध, भूकंप, त्सुनामी या बद्दल सांगू लागतो. वारंवार मुली होत असल्यामुळे कुटुंबाकडून होत असलेला दबाव, पाणी, वीज सारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, पण त्याच बरोबर याच वस्तूंची नासाडी मोठ मोठे मॉल, सिनेमा हॉल आणि उच्चभ्रु वस्तीत होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
त्याच वेळी संजीवनी आणि किशोर या परिस्थितीमुळे वैतागतात हे प्रकर्षाने या नाटकात मांडण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*