महाराष्ट्रातील संक्राती सोबतच उत्तर-दक्षिण भारतीयांमध्ये पोंगलची धामधुम

0

पंकज पाटील । डिजीटल देशदूत : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार्‍या संक्राती सणासोबतच उत्तर -दक्षिण भारतातही ‘पोंगल’ सणाची मोठी धामधुम दिसून येत आहे.

मकर संक्रांतीसोबतच उत्तर -दक्षिण भारतात हा पोंगल उत्सव सलग चार दिवस साजरा केला जातो. यातील मुख्य उत्सव हा पौष महिन्यातील प्रतिपदेला साजरा केला जातो. पोंगल अर्थात खिचडीचा उत्सव सूर्याच्या उत्तरायणातील प्रवेशानंतर साजरा केला जातो.

काय आहे पोंगल

पोंगल च्या आधी येणार्‍या आमावस्येला लोक वाईट रितींचा त्याग करून चांगल्या बाबी ग्रहण करण्याची प्रतिज्ञा घेतात. यास उत्तर -दक्षिण भारतात ‘ पोही’ अर्थात ‘ त्याग करणारी’ असे संबोधले जाते. पोंगलचा तामिळ भाषेत उफान किंवा विप्लव होने असे मानले जाते. या पोहीच्या दुसर्‍या दिवशी अर्थात प्रतिपदेस दिवाळीप्रमाणे पोंगलची धामधुम असते.
उत्तर व दक्षिण भारतात पोंगल सण दिवाळीसारखाच मोठ्या उत्साहात साजरा करतात. सलग चार दिवस चालणारा या उत्सवात पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस सूर्य, तीसरा दिवस मट्टू अथार्र्त नंदी बैलाची पूजा आणि चौथ्या दिवशी कन्या पूजन केले जाते.

महाराष्ट्रातील पोळा आणि कन्या पूजनाप्रमाणेच हे सणही उत्तर – दक्षिण भारतात साजरे होत असतात.

दक्षिण भारतात नव वर्षारंभ

या काळात शेतातील पिकलेले धान्य घरात आणले जाते. घरात धान्य आल्याने वर्षभर केलेल्या कष्टाचा आनंद साजरा करण्यासाठी पोंगल साजरा केला जातो. चार दिवस चालणार्‍या या सणात पहिल्या दिवशी घराची व परिसराची साफसफाई करून कचरा जाळला जातो. दुसर्‍या दिवशी लक्ष्मीची व तीसर्‍या दिवशी पशूधनाची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी काली मातेची पूजा केली जाते. घराबाहेर सडा रांगोळी घातली जाते. नवीन कपडे, विविध वस्तूची खरेदी केली जाते. पशुधनासही अंघोळ घालून त्यांनाही सजविले जाते.

गायीच्या दूधाच उफान

या उत्सवात गायीच्या दूधाला फार महत्व दिले जाते. गायीचे दूध हे जसे शुध्द सात्विक व आरोग्य वर्धक असते. त्यामुळे गायीचे ताजे दूध नवीन भांड्यात गरत उकळून त्याचे सेवन केले जाते. या दिवशी विशेष प्रेारची खीर तयार केली जाते. तांदुळ, दूध, तूप व साखरेचे पदार्थ तयार करून त्याचा नैवेद्य सूर्याला अर्पण केला जातो.

LEAVE A REPLY

*