शेतकरी संपाबाबत अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीचे स्वागत- सदाभाऊ खोत

0
मुंबई  / ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. तरी त्यांनी शेतकर्‍यांच्या संपात मध्यस्थी केल्यास सरकार स्वागतच करेल असेही सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

शहरातील उपनगरांतील भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे ट्रक-टेम्पो सकाळीच नेहमीप्रमाणे पोहोचले असून दुधाचाही तुटवडा नसल्याचा दावा पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
शेतकरी संपाचा काहीही फरक पडला नसल्याचा दावा करीत सदाभाऊंनी पुण्यात भाजीपाला घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांच्या संरक्षण आणि मदतीसाठी पणन विभागाने नियंत्रण कक्ष सुरू केल्याची माहिती दिली. पुण्यात 20 टक्के फरक पडला आहे. नाशिक आणि नगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत 50 टक्के आवक कमी झाली आहे.
शेतकर्‍यांचा प्रश्न सुटू नये, हे आंदोलन चिघळावे यासाठी काँग—ेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ते म्हणाले की, चर्चेतून शेतकर्‍यांचा प्रश्न सोडवावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे.

मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली असून नक्कीच शेतकर्‍यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधकांनीही सरकारशी चर्चा करावी, असे त्यांनी सूचविले आहे.

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पणन विभागाने टोल फ्री नंबर सुरू केला आहे. जे शेतकरी आपला माल बाजारात नेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना पणन विभाग मदत करणार आहे. पणन विभागाचा 1800 2330244 हा टोल फ्री नंबर आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर केवळ फडणवीस सरकारनेच चर्चेला बोलविले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

मुंबईत अवैध दरवाढ करणार्‍या विरोधात तक्रार केल्यास कारवाई करण्याचे पणनमंत्र्यांनी आश्वासने दिले आहे.

LEAVE A REPLY

*