व्यापारी संकुलातील स्वच्छतेची जबाबदारी गाळेधारकांचीच – साडेचार हजार गाळेधारकांना नोटीस

0

जळगाव  प्रतिनिधी :  गोलाणी व्यापारी संकुलातील अस्वच्छतेबाबत शरद काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी पाहणी करुन मनपा प्रशासनाला नोटीस बजावली.

त्यानुसार मनपातील २७ व्यापारी संकुलातील स्वच्छतेची जबाबदारी गाळेधारकांचीच असल्याने मनपा प्रशासनाने ४ हजार ६४१ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे.
महानगरपालिकेच्या २७ व्यापारी संकुलातील साफसफाईची जबाबदारी ही गाळेधारकांचीच राहील. याबाबत महापालिकेशी केलेल्या करारात म्हटले आहे. त्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी व्यापारी संकुलातील साफसफाई बंद केली होती.

दरम्यान, गोलाणी व्यापारी संकुलात साफसफाई अभावी कचर्‍याचे ढिग साचले आहेत. परिणामी दुर्गंधी येत असल्याने आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. अशी तक्रार शरद काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेवून प्रांताधिकारी जलज शर्मा यांनी गोलाणी व्यापारी संकुलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे प्रांताधिकार्‍यांनी मनपा प्रशासनाला नोटीस बजावून त्याचा अहवाल मागविला आहे.

दरम्यान, मनपातील २७ व्यापारी संकुलातील स्वच्छतेची जबाबदारी गाळेधारकांचीच असल्याने मनपा प्रशासनाने ४ हजार ६४१ गाळेधारकांना नोटीस बजावली आहे.

अशी आहे नोटीस

मनपा प्रशासनाने व्यापारी संकुलातील गाळेधारकांना स्वच्छतेबाबत नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये महापालिकेने गाळे देतांना केलेल्या करारनुसार व्यापारी संकुलातील स्वच्छतेचे जबाबदारी ही गाळेधारकांचीच आहे. व्यापारी संकुलातील साफसफाईकरीता मनपाची सेवा हवी असल्यास दैनंदिन साफसफाईकरीता येणारा खर्च मनपाकडे अदा

करावा लागेल. त्यासाठी दररोज साफसफाईसाठी मनपामार्फत स्वतंत्र कर्मचारी नेमले जातील. मनपाकडे रक्कम भरायची नसेल तर सर्व व्यापारी मिळून आपल्या खर्चाने आपण स्वच्छतेसाठी वेगळा स्टाफ लावू शकतात.

अशा वेळी कचरा उचलून देण्याची व्यवस्था मनपा करत. असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*