चोपडा तालुक्यात स्टॅार्च प्रकल्पाची मनिषा : माजी आ. कैलास पाटील

0
चहार्डी, ता. चोपडा|  प्रतिनिधी :  साखर कारखान्याची अवस्था खराब असून आज तालुक्यात तरुण बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असून ते पाहून दुःख होते. त्यामुळे खासगी प्रकल्प उभे राहिले पाहिजे.आता मला तालुक्यातून स्टार्च प्रकल्प उभा करण्याचे माझे स्वप्न आहे.

जागेचा शब्द मला वेळोदेकरांनी दिला आहे. तालुक्यात सहकार वाचला पाहिजे. सहकार महर्षी ङ्गक्त तालुक्यात धोंडू अप्पाच होऊ शकतात दुसरे कोणीही नाही.कै धोंडू आप्पानी कारखाना उभा केला आणि सुतगिरणीत डॉ सुरेश जी पाटील यांनी सुद्धा मोठे परिश्रम घेतले.असे प्रतिपादन माजी आ.कैलास पाटील यांनी गिरीराज लॅान्सवर झालेल्या वाढदिवसानिमित्तच्या सत्काराला उत्तर देतांना सांगितले.

यावेळी बोलतांना माजी आ.पाटील म्हणाले की, मंदिरात जप करणारा शेतकर्‍यांचा मुलगा म्हणून गोरगरिबाची सेवा करावी म्हणून कठोरा गावातून कामाची सुरुवात केली.हिंदुत्वाचा विचार आणि लहान पणी शिवाजी महाराजांचा पोवाळेची मोठी आवडी तुन गावाचा १९९३ साली कठोरा गावाचा सरपंच केले होते.

आत्माराम म्हाळके,हुतामे कन्हेये बंधू,दिपकसिग जोहरी,विजयसिग राजपूत,यांनी मला शिवसेनेत आणले.म्हणून मी आज उभा आहे आणि शिवसेनेचा आमदार होऊ शकलो होतो.

१९९५,१९९९साली विधानसभेत पराभूत झाल्यावर हि मला तिसर्‍यांदा निवडणुकीत उभा राहिल्यावर २००४ साली मला विधानसभेत पाठवले.

पहिल्यांदा विधानसभेत गेल्यावर कळत नव्हते. मात्र हिवाळी अधिवेशनात अजित पवार, छगन भुजबळ यांची मनं मी जिकली होती, शेतकर्‍यांचा प्रकल्प म्हणून गूळ प्रकल्पास अजित पवारांनी मोठी मदत मला केली होती.म्हणून तो प्रकल्प आज पूर्ण झालेला दिसतो आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन माजी आ.चिमणराव पाटील म्हणाले की, कैलासबापूंनी मोठ्या परिश्रमांनी सुतगिरणी चालू केली आहे.सरकार मध्ये शिवसेना आहे याची जाणीव वाटत नाही.

देवेंद्र ङ्गडणवीस कापसासाठी भांडत होते,मी त्याच्या सोबत दहा वर्षे आमदार होतो,मंत्री गिरीश महाजन यांनी तर जळगाव ला आमरण उपोषण केले होते मात्र ते सुद्धा शेतकऱयाना भाव देऊ शकले नाहीत.

मंचावर,आशा कैलास पाटील,नगराध्यक्ष मनीषा चौधरी,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख इंदिराताई पाटील,राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विजया पाटील,गटनेते जीवन चौधरी,मनसेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल वानखेडे, प स सभापती आत्माराम म्हाळके,नगराध्यक्षा मनिषा चौधरी,उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख,पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,संचालक सुनिल जैन,गट नेते जीवन चौधरी,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अमृतराज सचदेव,चोसाका माजी चेअरमन ऍड घनश्याम पाटील,बाजार समिती सभापती जगन्नाथ पाटील,उपसभापती नदंकिशोर पाटील,जिल्हा दूध संघाचे संचालक ए डी चौधरी,बाजार समिती संचालक अरुण पाटील,कांतीलाल पाटील,दिनकरराव देशमुख,डॉ दीपक पाटील,जागृती बोरसे,रंजना नेवे,प्रकाश रजाळे,रामदास चौधरी,रवींद्र सोनवणे,डीगंबर पाटील,अनिल पाटील,गिरिष पाटील,एस.बी.पाटील,आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक पाटील, देवेंद्र सोनवणे,रवींद्र पाटील, सुनील पाटील, सुनिल बडगुजर, मनोहर पाटील, आदीनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*