Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

सर्वांगिण विकासासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा

Share
स्त्री म्हटली म्हणजे तिला परिवारातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागत असते. आजची स्त्री ही फक्त चुल आणि मुल मर्यादित राहिलेली नसून या आधुनिक युगात पुरूषाच्या बरोबरीने आपले कार्य प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टपणे पार पाडीत आहे.

आजही काही ठिकाणी स्त्रीया विषयी जो चुकीच गैरसमजातून वेगळी वागणूक दिली जाते. त्याबाबतीत जनजागृती होवून त्याठिकाणी स्त्रीयांनीच पुढे येऊन आपला हक्क व आपले अस्तित्व दाखविणे गरजेचे आहे. स्त्रीयांनी राजकारणात फक्त सह्यापुरती मर्यादित न राहता निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. आपल्या मुलींना आपले आत्मसंरक्षण बाबतीत सक्षम करून अन्यायाविरूध्द लढण्याची ताकद त्याच्यात निर्माण करून एक नारी शक्तीचे स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करणे गरजेचे आहे.

आपल्या स्वयंरोजगार किंवा नोकरी या माध्यमातून आपल्या उदरनिर्वाहाची जबाबदारी महिलांनी सुध्दा स्विकारणे महत्वाचे आहे. आपल्या मुला, मुलींवर चांगले संस्कार कसे करता येतील त्यासाठी त्यांनी योग्य मार्गदर्शन, सुशिक्षण देवून समाजभिमूख तयार करावे.

चुकीच्या गोष्टींना वेळीच आळा घालून चांगल्या गोष्टी कौतुक करावे. स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली असून महिला शक्ती ही समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी एक महत्वाचा घटक आहे.

– सौ.नयना भरत चौधरी यावल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!