तोंडापूर येथे वीज पडून बालकाचा मृत्यू

0

देशदूत चमूकडून | जळगाव :   तोंडापूर येथील बकर्‍या चारणारे शाळकरी मुलांच्या अंगावर वीज पडून एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर दोन जण जखमी झाले आहे. तर दुसरी घटना गारखेड्यातील  कपाशीची लागवड करीत असतांना  अंगावर वीज पडल्याने दोघे पती-पत्नी भाजले. तर पारोळा तालुक्यातील सोके व टोळी येथे विज कोसळुन दोन बैल ठार झाल्याची घटना घडली.

तोंडापूर येथे आज दुपारी ४ वाजता वीज पडून बकर्‍या चारणारे शाळकरी मुलांच्या अंगावर वीज पडून एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे मुले जखमी झाले. ही घटना दुपारी ४ वाजता तोंडापूर मध्यम प्रकल्प या वाटर फिल्टर प्लॅन्टच्या जवळ घडली.

या घटनेत मयत गणेश दादाराव इंगळे (वय-१४) याचा जागीच मृत्यू झाला तर दिनेश सुधाकर इंगळे व विशाल कैलास गवळी हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत या दोघांना जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गारखेड्यात पती -पत्नी भाजले

गारखेडा- गुरूवारी दि.१ रोजी सुबाराम तंटु पावरा (भिलाले) (वय ४५) व पत्नी भुरीबाई सुबाराम पावरा (वय ४०) रा.रामणकोट जि.खरगोण हे दोघजण शेतात कपाशीची लागवड करीत असतांना दु.३.४५ वाजता मान्सुनपुर्व पावसाची सुरूवात झाली.विजेच्या कडकडाटसह वारा सुसाट वेगाने वाहू लागला.

याचवेळी सुबाराम व भुरीबाई पावरा यांच्या अंगावर वीज कोसळल्याने दोघेजण भाजले गेले.यात पत्नी भुरीबाई हि जास्त भाजल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. शेती गट न.१३६/१ एकनाथ नारायण चौधरी यांच्या मालकीची असून सुबाराम पावरा यांनी ही जमीन नफ्याने केली आहे.

या दोघांना जामनेर येथील रग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगावला जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

पारोळ्यात दोन बैल ठार

तालुक्यातील सोके व टोळी येथे विज कोसळुन दोन बैल ठार झाल्याची घटना दि. १ जुन रोजी सायंकाळी घडली. सायंकाळी वादळी वार्‍यासह विजांचा कडकडासह १५ मिनिटे पाऊस होवुन तालुक्यातील सोके येथे भगवान राजाराम पाटील यांच्या सोके शिवारातील शेतात वखरटी करीत असतांना अचानक वादळ आल्याने औत सोडून निंबाच्या झाडाखाली थांबले असता झाडावर वीज कोसळुन एक बैल जागीच ठार झाला .

तर एक बैल व भगवान पाटील जखमी झाले तर टोळी येथे रविंद्र शांताराम पाटील यांच्या टोळी शिवारातील शेतात निंबाच्या झाडाखाली बैलजोडी बांधली असता झाडावर वीज कोसळल्याने एक बैल जागीच ठार झाला याबाबत पारोळा पो.स्टे.ला नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*