घरातून पळून आलेला ‘अथर्व’ आई-वडिलांच्या हवाली : सुनील अंबाडे यांची समयसुचकता

0

भुसावळ | प्रतिनिधी :   येथील मध्य रेल्वेत कमर्शियल इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेले सुनील चंद्रकांत अंबाडे यांनी समय सुचकता दाखवून शहर पोलिसांच्या मदतीने  घरातून निघुन आलेल्या १३ वर्षिय अथर्व चंद्रकांत अदक या ७ वीत शिकणार्‍या चिमुकल्याला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधिन करुन मुंबई येथील मुलुंड ला घरी रवाना करीत माणुसकीचे उदाहरण सादर केले आहे.

शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी येथील हंबर्डीकर चौकातील पाणी गेट येथे १३ वर्षाचा मुुलगा रस्त्यावरुन जाणारे सुनील अंबाडे यांच्या जवळ आला व मला खुप भुक लागली आहे. मला काही खाण्यास मिळेल का? असे विचारले.

या लहान मुलाल बघताच क्षणी तो चांगल्या घरातील असल्याचे जाणवल्याने सुनील अंबाडे यांनी त्याला पाणी गेट चौकात असलेल्या दत्ता रेस्टारंट मध्ये नेऊन १ ग्लास दुध व बिस्किट पुडा घेऊन दिला.

भुकेमुळे या चिमुरड्याने क्षणार्धात भिस्किट पुडा संपविला व आणखी मिळेल का? असे विचारले त्यावरुन त्यास आणखी दोन पुडे देऊन श्री. अंबाडे यांनी या बालकास त्याचे नाव, पत्ता, कितवीत शिकतो, शाळेचे नाव काय, घरी कोण कोण आहे अशी चौकशी केली.

त्यावरुन या बालकाने त्याचे नाव अथर्व चंद्रकांत अदक असल्याचे सांगून तो मुुलुंड येथील होली ऐंजल स्कुल मध्ये इयत्ता ७वीत शिकत असल्याचे सांगितले. तसेच त्याने विचारल्यावर दिलेल्या मोबाईलवरुन संपर्क साधला असता तो नंबर त्याच्या शाळेचे फादर मि. मोहन यांना लागला.

त्यांच्याकडे अथर्व अदक याची चौकशी केली असता तेथून त्याचे वडिल चंद्रकांत अदक यांचा नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला त्यांना अथर्व बाबत विचारले असता तो खेळत असेल असे त्यांनी उत्तर दिल्याने अथर्व हा मुलुंड येथून ४०० किमी लांब भुसावळ येथे असल्याबाबत ते देखखिल अनभिज्ञ होते.

त्यांना अथर्व भुसावळ येथे असल्याची माहिती सांगून त्यास घेऊन जाण्याची विनंती केली. अर्थवची आई सौ. शोभा अदक या दुग्ध व्यवसाय करीत असून त्याचे वडिल सकाळी दुध वाटून जीम खाना मुुलुंड येथे अकाउंटंट म्हणून काम करीत असल्याने ते अथर्वबाबत अनभिज्ञ असल्याचे नंतर समजले.

इकडे सुुनील अंबाडे यांनी दोन तास अथक परिश्रम घेऊन अथर्वच्या घरच्यांना सुचना दिल्यावर अथर्व यास रात्री शहर पोलिसांच्या स्वाधिन केले.शहर पो.स्टे. ला अथर्व सापडल्याची नोंद घेण्यात आली व पो.स्टे.तून त्याच्या घरी कळवून अथर्व यास घेऊन जाण्याचे सांणञयात आले.

त्यामुळे शनिवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी अथर्वचे आई-वडिल भुसाव़ळ येथे शहर पो.स्टे.ला दाखल झाले.यावेळी रोटरीचे प्रांतपाल राजिव शर्मा, रेल्वेचे भुसावळ मंडळ प्रचार निरीक्षक जिवन चौधरी, सुनील अंबाडे यांच्या उपस्थितीत शहर पोलिसांनी अथर्व याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

सुनील अंबाडे यांनी दाखविलेली माणुसकी समाजात प्रत्येकाने दाखविल्यास असे अनेक अथर्व त्यांच्या आई -वडिलांच्या मायेच्या सावलीत सुखरुप परत जातील यात शंका नाही.

LEAVE A REPLY

*