४५ वर्षांसाठी २३ रेल्वेस्थानकांचे खासगीकरण !

0
नीरज वाघमारे | भुसावळ  :  देशामध्ये खाजगीकरणाचे वारे वाहत असतांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने काही कामांचे खाजगीकरण केेलेले आहे.यातच एक पाऊल पूढे टाकून ४५ वर्षांसाठी २३ रेल्वे स्थानकांचे खाजगीकरण करण्याचा बिगुल वाजला आहे.

केंद्रीय कॅबीनेट मंत्री मंडळाने ५ एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णया नुसार रेल्वे डेव्हलपमेंट ऑथर्टी(आरडीए)ने रेल्वे कायद्यात दुरूस्ती न करता प्रवाशी आणि मालवाहतुक रेल्वे गाड्यांसंदर्भात निर्णय घेतले आहेत.

खाजगी गाडयांच्या कामाला रेल्वेचे रूळ व यार्ड वापरता येणार आहे तसेच डब्यांच्या दुरूस्तीसाठी वर्कशॉप देखील वापरता येणार आहे.

सोबतच रेल्वेच्या २३ स्थानकांचा खाजगीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आरडीए ही सर्व कारवाई ३१ ऑगस्ट पुर्वी होणार आहे.

पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी त्यांचे खाजगीकरण करण्याचे रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन होते.

त्याअनुषंगाने रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेचे मुंबई विभागातील लोकमान्य टिळक स्थानक गुंतवणूक २५० कोटी रूपये, ठाणे २०० कोटी रूपये, पुणे विभागातील पुणे स्थानक २०० कोटी रूपये, इस्ट कॉस्ट रेल्वे चे विशाखापट्टणम २०० कोटी रूपये, पूर्व रेल्वेचे हावडा विभागातील हावडा रेल्वे स्थानक ४०० कोटी रूपयांची निविदा निघणार आहे.

उत्तर मध्य रेल्वेचे अलाहाबाद विभागातील अलाहाबाद स्थानक १५० कोटी रूपये, कानपूर सेंट्रल २०० कोटी, उत्तर पश्‍चिम रेल्वेचे अजमेर विभागातील उदयपूर शहर स्थानक १०० कोटी रूपये, उत्तर पूर्व ङ्ग्रंटीयर रेल्वेचे लुडिग विभागाचे कामाख्या रेल्वे स्थानक २२८ कोटी रूपयांची निविदा निघणार आहे.

उत्तरेतर रेल्वेचे ङ्गिरोजपूर विभागाचे जम्मु रेल्वे स्थानक ७५ कोटी रूपये, दिल्ली विभागाचे ङ्गरदिबाद रेल्वे स्थानक ७० कोटी रूपये, दक्षिण मध्य रेल्वेचे विजयवाडा विभागाचे सिकंदराबाद रेल्वे स्थानक २८२ कोटी रूपये, दक्षिण पूर्व रेल्वेचे रांची विभागाचे रांची रेल्वे स्थानक १०० कोटी रूपयांची निविदा निघणार आहे.

दक्षिण पश्‍चिम रेल्वेचे बंगलोरू विभागाचे बंगलोर कॅन्ट स्थानक ८० कोटी रूपये, यशवंतपुर रेल्वे स्थानक १०० कोटी रूपये. दक्षिणेतर रेल्वेचे चेन्नई विभागाचे चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक ३५० कोटी रूपये, पलघट विभागाचे कालीकत स्थानक ७५ कोटीरूपयांची निविदा निघणार आहे.

पश्‍चिम मध्य रेल्वेचे भोपाळ विभागातील भोपाळ रेल्वे स्थानक ७५ कोटी, पश्‍चिमोत्तर रेल्वेचे रतलाम विभागाचे इंदौर रेल्वे स्थानक ७५ कोटी, मुंबई मध्य रेल्वे विभागातील मुंबई सेंट्रल टर्मिनन्स २५० कोटी, बांद्रा टर्मिनन्स २०० कोटी, बोरिवली २८० कोटी रूपये एवढ्या रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून लवकरच त्याबाबत निविदा निघणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार स्टेशनावरील सर्व कारवाई सुलभ करण्यासाठी व्यवस्थापकांची कंत्राटदाराप्रमाणे (एसएङ्गएमएस) नियुक्ती करण्यात येणार आहे. हे व्यवस्थापक स्थानकाचा विकास, पुनर्विकास आणि वाणिज्यक विकास कंत्राटातील तरतुदीप्रमाणे करतील.

रेल्वे प्रशासन, गाड्यांचे दळणवळण, पार्सल, तिकीट विक्री, प्रवाशी आणि मालाचे स्थलांतरण करेल. ओव्हर हेड ट्रॅक्शन, सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन, रूळांचे काम रेल्वे प्रशासन करेल. यासाठी स्टेशन ङ्गॅसिलेशन मॅनेजर (एसएङ्गएमएस) सोबत असेल.

सध्याचा कार्यरत रेल्वे कर्मचारी अन्य कारवाईसाठी कार्यरत असतील. त्यांचे कार्य एसएङ्गएमएस चे खाजगी कर्मचारी करू शकतील.

एसएङ्गएम त्याला आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देईल आणि त्यांना गणवेश व ओळखपत्र आवश्यक असेल. एसएङ्गएम ने लिज प्रिमीअम रेल्वेला द्यावयाची असून त्याचा कालावधी ४५ वर्षांच्या असेल.

यामुळे भविष्यात रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचा सुर व्यक्त केला जात आहे. रेल्वेच्या सुविधा नागरिकांनी उपभोगण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे देखील तितकेच अपेक्षित आहे. अन्यथा नुकत्याच सुरू झालेल्या तेजस एक्सप्रेसमधील सुविधांचा प्रवाशांनी ज्या प्रमाणे बट्ट्याबोळ केला तसे अपेक्षित नाही.

LEAVE A REPLY

*