आरटीई अंतर्गत सोडतद्वारे 30 जागा निश्चित

0
जळगाव । आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासंदर्भात आज सद्गुरू एज्युकेशन सोसायटीच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्रवेश निश्चितसाठी बालकांच्या हस्ते 0 ते 9 प्रमाणे 3 बाउलमधून 30 अंक काढण्यात आले.

या 30 आकड्यांची सीट ऑनलाईन नोंदणी करुन पुणे शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आली असुन प्रवेश निश्चितीबाबत पालकांना एसएमएस पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 261 शाळांमध्ये आरटीई अंतर्गंत आरक्षणानुसार नव्या शैक्षणिक वर्षात नर्सरी व 1 ली इयत्तेमध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आले होते. यात 3 हजार 817 जागांसाठी 5 हजार 256 अर्ज प्राप्त झाले आहे. दरम्यान, ऑनलाईन पध्दतीने आलेल्या अर्जांची सोडत आज पार पडली.

यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी डी.एम.देवांग, विस्तार अधिकारी खलील शेख, गुरूनंदन सुर्यवंशी, अमोल महाजन, प्रविण पाटील आदींसह पालक व मुख्यध्यापक उपस्थित होते. सभागृहात 0ते9 प्रमाणे 3 बाउलमधून 30 आकडे लहान मुलांकडून काढण्यात आले असून ती 30 आकड्यांची सीट ऑनलाईन पाठवण्यात आली आहे.

पुणे शिक्षण मंडळाकडून आता प्रत्येक शाळांच्या 25 टक्के कोट्यात रिक्त असलेल्या जागा लॉटरी पद्धतीने सोडत करून संबधीत विद्यार्थ्यांची यादी शाळांना पाठविली जाणार आहे. तसेच प्रत्येक पालकास आपल्या मुलांचा प्रवेशाचा मेसेज त्यांचा मोबाइल वर देण्यात येईल.

त्यानंतर पालकांनी संबधीत शाळेत वेळनिश्चित केल्यानुसार प्रवेश घ्यावा त्यासाठी कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

तसेच प्रवेश निश्चितीचे मॅसेज आल्यानंतर पालकांनी बालकाच्या वेबसाईट वरून सिट पेपर काढून तो शाळेत सादर करावयाचा आहे. पालकांना अडचणी आल्यास प्रत्येक तालुक्यात नोडेल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.

या अधिकार्‍यांमार्फत पालकांच्या अडचणी सोडविल्या जाऊन प्रवेश देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*