स्वप्नांचा पाठलाग करणारी प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील

0
जळगाव / सन 2015 मध्ये झालेल्या युपीएससी परिक्षेत 773 क्रमांकावर उत्तीर्ण झाली. त्यानुसार रेल्वे विभागात नियुक्ती झाली.
परंतु रेल्वे विभागाने अंध व्यक्तीला नोकरी देवू शकत नाही या कारणावरुन नाकारले.
त्याचवेळी अपंगत्वावर मात करत आयएएस होण्यासाठी स्वप्नांचा पाठलाग केला. आणि सन 2016 मध्ये झालेल्या परिक्षेत देशात 112 क्रमांक तर महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर यश मिळविल्याची भावना प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील हिने दै.देशदूतशी बोलतांना व्यक्त केली.

जळगाव जिल्हा बोदवड तालुक्यातील वडजी येथील मुळ रहिवासी असलेल्या प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील हिचे वडील एल.बी.पाटील हे मुंबई दुरदर्शन येथे नोकरीला असल्यामुळे ते उल्हासनगर येथे स्थायिक झालेत.

वयाच्या सातव्या वर्षी एका अपघातात प्रांजलने दृष्टी गमावली. प्रांजलची आईने बी.कॉमची पदवी घेतली आहे. आईला नोकरीसाठी अनेकवेळा संधी आली.

परंतु प्रज्ञाचक्षु प्रांजलसाठी आईने नोकरी स्विकारली नाही. पहिली ते तिसरीपर्यंत प्रांजलने उल्हासनगर येथे शिक्षण घेतले.

चौथी ते दहावीपर्यंत कमलाबाई मेहता हायस्कुल दादर, अकरावी व बारावीचे शिक्षण सी.एच.एम.कॉलेज उल्हासनगर तर बी.ए.चे शिक्षण सेंट झेविअसर्र् कॉलेज येथे घेतले.

त्यानंतर एम.ए. आणि एम.फीलचे शिक्षण जेएनयू दिल्ली येथे घेतली असून सध्या दिल्ली येथे राज्यशास्त्र या विषयात लेबनान या देशावर प्रांजलची पीएचडी सुरु आहे. 2015 मध्ये भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथील कोमलसिंग पाटील यांच्याशी विवाह झाले.

जिद्द आणि चिकाटीमुळे स्वप्न साकार
सन 2015 मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी परिक्षेत 773 क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. त्यानुसार रेल्वे विभागात नियुक्ती झाली. परंतु अंध व्यक्तीला नोकरी देवू शकत नाही.

याकारणावरुन रेल्वे विभागाने नोकरी नाकारली. त्याचवेळी पोस्ट अ‍ॅण्ड टेलिग्राममध्ये नोकरी स्विकारली. परंतु रेल्वे विभागाने नोकरी का नाकारली? या प्रश्नामुळे हताश झाली.

परंतु त्याच उमेदीने जोपर्यंत आयएएस होणार नाही. तोपर्यंत परिक्षा देणार अशी जिद्द मनात ठेवली. आणि या जिद्दीतूनच यावर्षी यश मिळविले.

हक्कासाठी लढा
रेल्वे विभागाने नोकरी नाकारल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची प्रज्ञाचक्षु प्रांजल पाटील हिने भेट घेतली. आपल्या हक्कासाठी लढा सुरु असतांनाच दुसरीकडे आयएएसच्या स्वप्नांचाही ती पाठलाग करत राहीली.

डोळसांनाही लाजवेल असं यश प्रज्ञाचक्षु प्रांजल हिने संपादन केले.

क्लास न लावता यश
युपीएससी परिक्षेसाठी कुठलेही क्लास न लावता ऑडीओ क्लिपच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या सहाय्याने अभ्यास केला असल्याचे प्रज्ञाचक्षु प्रांजल हिने सांगितले.

प्रांजलच्या कौतुकासाठी शब्द अपुरे
प्रांजलने आयएएस होण्याचे स्वप्न बघितले. त्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले. तिने घेतलेल्या परिश्रमामुळेच युपीएससीची परीक्षा पास झाली.

प्रांजलचे कौतुक करण्यासाठी खरे तर शब्द कमी पळतात. अशा शब्दात प्रांजलचे वडील एल.बी.पाटील यांनी भावना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*