आजपासून खान्देश नाट्य महोत्सवाची पर्वणी

0
भुसावळ / येथील उत्कर्ष कलाविष्कार संस्थेतर्फे येत्या 2 ते 4 जून 2017 दरम्यान स्व.नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सव 2017 आयोजित करण्यात आला असून दि. 2 रोजी सायंकाळी 6.30 वा तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख केने यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
भुसावळ येथील श्रीकृष्णचंद्र सभागृहात खान्देश नाट्य महोत्सव होणार असून उद्घाटनाप्रसंगी जेष्ठ रंगकर्मी शंभु पाटील हे तृतीयपंथी दिशा शेख केने यांची प्रकट मुलाखत घेणार आहे.

अध्यक्षस्थानी आ.संजय सावकारे तर प्रमुख अतिथी महेश फालक, दिलीप पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, सुरेश पाटील, अनिल जैन, पंडित सुरवाडे आदी उपस्थित राहणार आहे.

या राज्य नाट्यस्पर्धेत गाजलेल्या नाटकांचे सादरीकरण या महोत्सवात केले जाणार आहे. 2 जून रोजी युगंधर देशपांडे लिखित व ललित प्रभाकर दिग्दर्शित बैल मेलाय या नाटकांचे सादरीकरण मुंबई येथील अविष्कार संस्था करणार आहे.

रसिकांसाठी तीन दिवस ही मेजवानी राहणार आहे.

LEAVE A REPLY

*